१४७ रूपयांपर्यंत जाऊ शकतो सरकारी बँकेचा शेअर, वर्षभरात ४६ टक्क्यांची वाढ; खरेदी करावा का?

गेल्या वर्षभरात बँक ऑफ बडोदाच्या शेअर्सनं (bse sensex) जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. बुधवारी एनएसईवर हा स्टॉक 121 रूपयांवर बंद झाला होता. या शेअरनं गेल्या वर्षभराच्या कालावधीत 46 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत. या स्टॉकबाबत एक्सपर्ट्स बुलिश असून तो 147 रूपयांपर्यंत जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

एमके ग्लोबलनं बँक ऑफ बडोदाच्या शेअर्सचं 140 रुपयांचं टार्गेट ठेवलं आहे. दुसरीकडे, LKP सिक्युरिटीजने 147 रुपयांच्या टार्गेटसह (bse sensex) खरेदीचा सल्ला दिला आहे. एकूण 32 तज्ज्ञांपैकी 26 या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शेअबाबत बुलिश आहेत. यापैकी 15 जणांनी त्वरित खरेदी करण्याचा तर 11 जणांनी हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहेत. तर 4 जणांनी होल्ड तर दोघांनी या स्टॉकवर विक्रीचा सल्ला दिला आहे. 30 जून रोजी संपलेल्या तिमाहीत या स्टॉकमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक 9.14 टक्क्यांवरून कमी करत 8.23 ​​टक्के केली आहे. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक वाढवली आहे.

बँक ऑफ बडोदाच्या शेअर्सने गेल्या एका आठवड्यात 2.37 टक्क्यांचे रिटर्न्स दिले आहेत. तर एका महिन्यात या शेअरच्या किंमतीत 24.86 टक्क्यांची वाढ झाली आहे. जर आपण गेल्या 3 महिन्यांतील शेअर्सच्या च्कामगिरीबद्दल बोललो तर या स्टॉकने 7.36 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, यामध्ये 6 महिन्यांत 10.50 टक्क्यांची वाढ झाली आहे. शेअरचा 52 आठवड्यांचा हाय 123.55 रुपये आहे आणि लो 72.50 रुपये आहे.

कृपया तुमच्या स्वतःच्या जोखमीवर गुंतवणूक करा.

Smart News :


केंद्राने उसाच्या दरात केली 15 रुपये प्रतिक्विंटल वाढ

Leave a Reply

Your email address will not be published.