पेट्रोल-डिझेलच्या किंमती न वाढल्याने “या”कंपन्यांचे 19,000 कोटींचे नुकसान

सध्या देशातील पेट्रोल-डिझेल(Petrol-diesel) चे दर वाढत आहेत. पण त्या आधी गेल्या पाच महिन्यांमध्ये कोणतीही दरवाढ झाली नव्हती. त्यामुळे IOC, BPCL, HPCL या देशातील टॉप तीन पेट्रोलियम कंपन्यांना तब्बल 19 हजार कोटी रुपयांना सामोरं जावं लागलं असल्याचं मूडीजने आपल्या अहवालात म्हटलं आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर ही दरवाढ करण्यात आली नव्हती.
तीन कंपन्यांना नुकसान
मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने गुरुवारी त्यांच्या एका अहवालात सांगितलं आहे की पेट्रोल-डिझेलच्या(Petrol-diesel) किंमतीत वाढ न केल्याने इंडियन ऑईल कॉरपोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉरपोरेशन (HPCL) या तीन कंपन्यांना 2.25 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 19 हजार कोटींचे नुकसान सोसावं लागलं आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ
देशात 4 नोव्हेंबर 2021 पासून ते 21 मार्च 2022 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. पण या दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली. या काळात कच्च्या तेलाची किंमत ही 82 डॉलरवरुन ती 111 डॉलरवर पोहोचली आहे. त्यामुळे या तीन कंपन्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पाच महिन्यांनंतर 22 आणि 23 मार्चला देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या(Petrol-diesel) किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
मूडीजने आपल्या अहवालात सांगितलं आहे की, बाजारातील सध्याची स्थिती पाहता पेट्रोलियम वितरण कंपन्यांना पेट्रोलच्या विक्रीवर दररोज 25 डॉलर प्रति बॅरेल आणि डिझेलच्या किंमतीवर 24 डॉलर प्रतिबॅरेल नुकसान होत आहे.
Smart News:-
MPSC: राज्य सरकारची तब्बल 6 हजार जागा भरण्याची मागणी
हा जाळणारा उन्हाळाही उर्फीच्या कपड्यांसमोर फिका…
“काश्मीर फाइल्स टॅक्स फ्री कशाला? Youtube वर टाका, फ्री होईल”-केजरीवाल