अलर्ट! ATM मधून पैसे काढण्याआधी जाणून घ्या बँकेचा ‘हा’ नवा नियम!

banking

देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक (banking) ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना वेळोवेळी अलर्ट करत असते. नियमांमध्ये बदल केल्यावरही त्याबाबत माहिती देते. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सातत्याने सतर्क करत असते.

ऑनलाईन ट्रान्झेक्शन करताना ऑनलाईन फ्रॉड, सायबर क्राइमच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशात SBI ने आपल्या ग्राहकांना एटीएमसंबंधी (ATM) महत्त्वाची सूचना दिली आहे. ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यास OTP टाकणं गरजेचं आहे. असं न केल्यास फ्रॉड होण्याचा धोका असल्याचं SBI ने म्हटलं आहे.(banking)

SBI ने 1 जानेवारी 2022 पासून ATM ट्रान्झेक्शन अधिक सुरक्षित करण्यासाठी OTP बेस्ड ट्रान्झेक्शन सुरू केलं आहे. ATM Card द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी SBI आपल्या ग्राहकांना OTP बेस्ड एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देतं. या सुविधेमुळे ग्राहक ज्यावेळी ATM मधून पैसे काढतील, त्यावेळी त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर मेसेज येईल. हा मेसेज म्हणजे ऑथेंटिकेशनचा आधार असतो. OTP द्वारे 10000 रुपये किंवा त्याहून अधिक पैसे काढता येतील. याबाबत SBI ने ट्विट केलं आहे.

banking

असं करा ट्रान्झेक्शन

– सर्वात आधी ग्राहकांना रजिस्टर्ड नंबरवर OTP पाठवला जाईल.

– ग्राहक या OTP द्वारे ATM मधून पैसे काढू शकतात.

– OTP 4 अंकी असेल, याद्वारे एकदा ट्रान्झेक्शन करता येईल.

एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा :


Jio चे नवे Recharge Plan; वर्षभर करावा लागणार नाही रिचार्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *