12 रुपयांच्या या स्टॉकने गुंतवणुकदारांना बनवलं कोट्यधीश

एखाद्या स्टॉक (Stock) अर्थात शेअरमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे एखाद्या व्यवसायात (Business) गुंतवणूक (Investment) करण्यासारखं मानलं जातं. कोणताही व्यवसाय तुम्हाला दीर्घकाळ नफा देतो त्यामुळे आपले शॉर्ट टर्म सेंटिमेंट्स (Short Term Sentiments) नियंत्रणात ठेवून दीर्घकालीन (Long Term) गुंतवणूकीवर भर द्यावा, असा सल्ला स्टॉक गुंतवणूकदारांना दिला जातो. तसंच, गुंतवणुकदारांनी चांगलं बिझनेस मॉडेल आणि मजबूत फंडामेंटल्स चांगले असलेल्या स्टॉकची निवड करणं गरजेचं आहे.
चांगल्या शेअर्सची निवड करणं, त्यावर पैसे लावणं आणि त्यात दीर्घकाळ गुंतवणूक कायम ठेवणं हा शेअर बाजारातून पैसे कमवण्याचा सर्वांत महत्त्वाचा आणि मोठा मंत्र आहे.
दीर्घकालीन गुंतवणुकीत (Investment) तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो आणि त्यामुळे तुम्ही मालामाल होऊ शकता. दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे समजून घेण्यासाठी बाळकृष्ण इंडस्ट्रीजच्या (Balkrishna Industries) शेअर्सवर एक नजर टाकूया. गेल्या 13 वर्षांत या बहुराष्ट्रीय टायर उत्पादक कंपनीचे शेअर्स 12.18 रुपयांवरून वाढत 2000 रुपये प्रति शेअरपर्यंत पोहोचले आहेत. या 13 वर्षांच्या कालावधीत हा शेअर (Share) 16320 टक्क्यांनी वाढला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून हा शेअर विक्रीच्या दबावात आहे. गेल्या सहा महिन्यांत तो 20 टक्क्यांनी घसरला आहे. 2022 मध्ये आतापर्यंत हा शेअर 2327 रुपयांवरुन 2000 रुपयांवर आला आहे. म्हणजेच 2022 मध्ये आतापर्यंत या शेअरच्या किमतीत सुमारे 14 टक्क्यांनी घट झाली आहे. दुसरीकडे या शेअरच्या गेल्या एक वर्षातल्या प्रवासावर नजर टाकली तर तो 1640 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत या स्टॉकमध्ये सुमारे 22 टक्के वाढ झाली आहे.
पाच वर्षांत हा मल्टिबॅगर स्टॉक (Multibagger Stock) 700 रुपयांवरून 2000 रुपयांपर्यंत वाढला आहे. याचाच अर्थ हा स्टॉक 5 वर्षांत सुमारे 185 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या 10 वर्षांचा विचार करता, हा स्टॉक 125 रुपयांवरून वाढत 2000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या 10 वर्षांत त्यात सुमारे 1500 टक्के वाढ झाली आहे. त्याचवेळी गेल्या 13 वर्षांत हा स्टॉक 12.18 रुपयांवरून 2000 रुपयांवर आला आहे म्हणजेच गेल्या 13 वर्षांत त्यात 164 पट वाढ झाली आहे.
आता बाळकृष्ण इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या प्रवासावर नजर टाकल्यास, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 1 लाखांऐवजी 80 हजार मिळाले असते. पण एखाद्या व्यक्तीने 1 वर्षापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याला 1.22 लाख रुपये मिळाले असते.
एखाद्या व्यक्तीने 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 2.85 लाख रुपये मिळाले असते. एखाद्याने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 16 लाख रुपये मिळाले असते. त्याप्रमाणे 13 वर्षांपूर्वी जर कोणी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याला 1.64 कोटी रुपये मिळाले असते.
हेही वाचा :