दर महिना 6000 रुपये गुंतवणूक करुन बनाल करोडपती, पाहा कसं?

sip

एक करोडपती, कोट्यधीश होण्याची तुमची इच्छा असेल, तर हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. यासाठी अतिशय काटेकोरपणे, नियमितपणे गुंतवणूक करणं गरजेचं आहे. तुम्ही म्युचुअल फंडमध्ये (Mutual Fund) एसआयपीद्वारे (SIP) दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवत असाल, तर तुम्ही कोट्यधीश सहजपणे बनू शकता. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या SIP Calculator च्या आधारे तुम्ही दर महिन्याला 6000 रुपयांची SIP पुढील 20 वर्षांसाठी करत असाल, तर एक कोटीहून अधिकची रक्कम तुम्ही मिळवू शकता.

कसं आहे Calculation –

एचडीएफसी सिक्योरिटीजच्या अधिकृत वेबसाइटवर असलेल्या SIP Calculator नुसार, जर कोणी गुंतवणुकदार दर महिन्याला 6000 रुपये SIP मध्ये 20 वर्षांसाठी टाकत असेल आणि तो अॅग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असेल अर्थात कोणत्याही परिस्थितीत गुंतवणूक सुरूच ठेवत असेल, तर तो 20 वर्षानंतर कमीत-कमी 1,00,71,684 रुपये मिळवू शकेल. जर तुम्ही कंजरवेटिव्ह इन्व्हेस्टर असाल, तर तुम्हाला 58,06,335 रुपये मिळतील. जर तुम्ही मॉडरेट गुंतवणुकदार असाल, तर याच 6000 रुपयांच्या रकमेवर तुम्ही 20 वर्षानंतर 74,02,679 रुपये मिळवू शकता.

तुम्ही निवडलेल्या गुंतवणुकीच्या आधारावर अंदाजे रक्कम मोजली जाते. यात कंजरवेटिव्ह इन्व्हेस्टरसाठी 12.5 टक्के दर मानल्यास, मॉडरेट गुंतवणुकदारासाठी 14.5% दर आणि अॅग्रेसिव्ह इन्व्हेस्टरसाठी हा दर वार्षिक 17 मानला जातो.

sip

लाँग टर्ममध्ये गुंतवणूक करायची असल्यास म्युचुअल फंड चांगला पर्याय आहे. SIP द्वारे म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास हा सुरक्षित पर्याय मानला जातो. एका मोठ्या रकमेऐवजी गुंतवणुकदाराने दर महिन्याला गुंतवणूक करणं सोपं ठरतं. त्यामुळे लहान गुंतवणुकदारांना अधिक कालावधीत मोठा फंड जमा करण्यात मदत होते.

दरम्यान, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मार्केट रेग्युलेटर SEBI ने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी चेक, बँक ड्राफ्ट किंवा इतर फिजिकल मोडद्वारे पेमेंट थांबवण्यासाठी बदल केले आहेत. बदलानुसार, 1 एप्रिल 2022 पासून म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यासाठी, तुम्हाला फक्त UPI किंवा नेटबँकिंगद्वारे पैसे द्यावे लागतील. एकूणच, 31 मार्चपासून म्युच्युअल फंडांमध्ये चेक-डीडीद्वारे गुंतवणूक करण्याची सुविधा बंद होणार असून गुंतवणूक केवळ डिजिटल माध्यमातूनच करता येणार आहे.

हेही वाचा :


Google वर सर्च केलं आईचं नाव; समोर आलं धक्कादायक सत्य!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *