आज कोणत्या 10 शेअर्सवर कराल फोकस?

बुधवारी बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजीचे वातावरण (best stocks to buy today) दिसून आले. बाजाराने गेल्या 6 महिन्यांतील उच्चांक गाठला. रशिया आणि युक्रेनमधील शांतता चर्चेमुळे ऑटो, आयटी, बँका, कॅपिटल गुड्स आणि रिअॅल्टी स्टॉकमध्ये वाढ झाली. सेन्सेक्स 740.34 अंकांच्या अर्थात 1.28 टक्क्यांच्या वाढीसह 58,683.99 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 146.95 अंकांच्या अर्थात 1 टक्क्यांच्या वाढीसह 17,498.25 वर बंद झाला.

जागतिक बाजारपेठ अस्थिर राहिली, पण रशिया आणि युक्रेन यांच्यातील शांतता चर्चेमुळे हे युद्ध संपुष्टात येण्याची आशा निर्माण झाल्याचे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. त्यामुळेच भारतीय बाजारांत सकारात्मक वातावरण दिसून आले. कच्च्या तेलासह इतर वस्तूंच्या किमती घसरल्यानेही बाजाराला सपोर्ट मिळाल्याचेही ते म्हणाले.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

रशिया-युक्रेन शांतता चर्चेचे (best stocks to buy today) गुंतवणूकदारांनी स्वागत केल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. ज्यामुळे जागतिक स्तरावर बाजाराला काही प्रमाणात स्थिरता मिळाली. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने वाढत्या महागाईला आळा घालण्यास मदत होईल. त्यामुळे बुधवारी बाजारातही तेजी पाहायला मिळाली.

सध्या बाजार त्याच्या रझिस्टंस लेव्हलजवळ व्यवहार करत आहे आणि त्याने एक लहान हॅमर कॅन्डलस्टिक तयार केली आहे. जोपर्यंत निफ्टी 17400 च्या वर राहील तोपर्यंत तो 17,600-17,645 पातळीपर्यंत ब्रेकआउट राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जर निफ्टी 17,400 च्या खाली घसरला तर तो 17,350-17,265 पर्यंत कमजोरी दिसू शकते असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)

बजाज फायनान्स (BAJFINANCE)

पॉवरग्रीड (POWERGRID)

रामको सिमेंट (RAMCOCEM)

एसआरएफ लिमिटेड (SRF)

झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

पेज इंडिया (PAGEIND)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

हेही वाचा :


BREAKING: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *