बँकांच्या संपाबाबत मोठा निर्णय, युनियननी केली घोषणा!

इंडियन बँक्स असोसिएशनने बँक (bank unions) संघटनांच्या विविध मागण्यांबाबत चर्चेची तयारी दाखवल्यामुळे येत्या २७ जून २०२२ रोजीचा राष्ट्रीय संप पुढे ढकलण्याचा महत्वाचा निर्णय बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटनांच्या शिखर संघटनेनं घेतला.

या निर्णयामुळे सलग तीन दिवस बँका बंद राहण्याची शक्यता संपली आहे.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने (bank unions) कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी २७ जून २०२२ रोजी लाक्षणिक संपाची हाक दिली होती. या एक दिवसाच्या संपामुळे सलग तीन दिवस बँक बंद राहणार होत्या. कारण २५ जून २०२२ रोजी चौथ्या शनिवारची सुटी आणि २६ जून २०२२ रोजी रविवारची सुटी होती.

संप झाला असता तर सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार २७ जून २०२२ रोजीही बँका बंद राहिल्या असत्या. पण संप पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे आता सोमवार २७ जून २०२२ रोजी बँका त्यांच्या कार्यालयीन वेळेत कामकाज करतील.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्याची तयारी इंडियन बँक असोसिएशनने दर्शवली आहे. तशी एक बैठक आयबीए आणि युनायटेड बँक फोरम ऑफ बँक युनियनमध्ये २१ जून रोजी पार पडली. त्यानंतर २३ जून रोजी मुख्य कामगार आयुक्त सी. एस जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्मचारी संघटनेनं २७ जून २०२२ रोजीचा संप पुढे ढकल्याचे जाहीर करण्यात आले.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन या मध्यवर्ती संघटनेअंतर्गत ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन व नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स यांच्यासह नऊ संघटना संपात उतरणार होत्या. पेन्शन, पाच दिवसांचा आठवडा यांसह विविध मागण्यांसाठी हा संप होणार होता.

हेही वाचा :


कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक, उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ काढला मोर्चा!

Leave a Reply

Your email address will not be published.