lic ipo news | LIC IPO ची वाट पाहणाऱ्यासाठी मोठी अपडेट..!

देशातील सर्वात (lic ipo news) मोठी विमा कंपनी LIC चा IPO यावर्षी मार्चमध्ये येणार होता. पण रशिया-युक्रेन युद्ध आणि जागतिक संकेतांमुळे बाजारात प्रचंड अस्थिरता होती.
त्यामुळे IPO ची लिस्टिंग पुढे ढकलली गेली. मात्र, आता सरकार मे महिन्यात एलआयसीचा IPO सुरू आणण्याची तयारीत आहे. CNBC-TV 18 ने 5 एप्रिल रोजी सूत्रांशी झालेल्या संभाषणाच्या आधारे ही माहिती दिली आहे. रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स (RHP) संदर्भात सरकार बँकर्स आणि आर्थिक सल्लागारांच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले.(lic ipo news)
RHP हे ऑफर दस्तऐवजाचा संदर्भ देते जे जारी करणारी कंपनी लिस्ट करण्यापूर्वी बाजार नियामक सेबीला देते. RHP सोबत, LIC च्या IPO ची इश्यू किंमत निश्चित केली जाईल. तसेच कंपनीचा इश्यू कधी उघडेल हेही कळेल. सूत्रांनी असेही सांगितले की सरकार एलआयसीच्या इश्यूमध्ये 5% पेक्षा जास्त हिस्सा विकू शकते.
सूत्रांनी सीएनबीसी-टीव्ही 18 ला असेही सांगितले की 8 मार्च रोजी SEBI ने एलआयसीला इश्यू विकून पैसे उभारण्याची परवानगी दिली आहे. सेबीला सादर केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मसुद्यानुसार, सरकार 31 कोटी इक्विटी शेअर्स विकणार आहे. IPO चा एक भाग अँकर गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. पॉलिसीधारकांसाठी इश्यू रकमेपैकी सुमारे 10 टक्के रक्कम बाजूला ठेवली जाईल.
2022 या आर्थिक वर्षात सरकारने 5 टक्के स्टेक विकून 63,000 कोटी रुपये उभारायचे ठरवले होते. परंतु बाजारातील अस्थिरतेमुळे एलआयसीचा इश्यू मार्च 2022 पर्यंत लॉन्च होऊ शकला नाही. 10 लाख उत्पन्न असेल तरी टॅक्सचं टेन्शन घेऊ नका, अशारितीने गुंतवणूक करुन मिळवा फायदा कधीपर्यंत IPO लॉन्च होऊ शकतो? एलआयसीचा आयपीओ आणण्यासाठी सरकारकडे 12 मे पर्यंत वेळ आहे. जर सरकार 12 मे पर्यंत हा इश्यू आणू शकले नाही, तर त्यांना DRHP पुन्हा सेबीकडे जमा करावे लागेल.
सरकारने 12 फेब्रुवारीला डीआरएचपी सादर केला होता. त्यानुसार 12 मेपर्यंत इश्यू आणावा लागणार आहे. गाडी पेक्षा टोल महाग! ड्राव्हरच्या खात्यातून कापला 43 लाखांचा टोल; चूक मान्य पण कंपनीचा पैसे देण्यासही नकार पूर्णपणे ऑफर फॉर सेल LIC चा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) असेल.
यात सरकार आपला हिस्सा विकणार आहे. कोणताही नवीन इश्यू जारी केला जाणार नाही. सरकारची LIC मध्ये 100 टक्के हिस्सेदारी आहे म्हणजेच 632.49 कोटी शेअर्स आहेत. कंपनीच्या शेअर्सची फेस वॅल्य 10 रुपये आहे. LIC चा आयपीओ हा भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO आहे. कंपनीच्या लिस्टिंगनंतर, तिचे बाजार मूल्य RIL आणि TCS सारख्या शीर्ष कंपन्यांच्या बरोबरीने पोहोचेल.
हेही वाचा :