NDTV मध्ये मोठी उलथापालथ; गुंतवणूकदार मात्र मालामाल

अदानी समुहाने ताबा घेतल्यानंतर मीडिया हाऊस एनडीटीव्हीमध्ये अनेक उलथापालथ झाले आहे. या आठवड्यात NDTV (ndtv share) मध्ये तीन मोठे राजीनामे झाले आहेत. एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांनी प्रमोटर ग्रुप ऑफ कंपनी आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता.

यानंतर एनडीटीव्ही (ndtv share) हिंदीचे रवीश कुमार यांनी चॅनल सोडले. एकीकडे चॅनलमध्ये असं चिंतेचं वातावरण असताना, एनडीटीव्हीच्या शेअरची किंमत झपाट्याने वाढत आहे. गुंतवणूकदारांना याचा मोठा फायदा होत आहे.

आज गुरुवारी एनडीटीव्हीचा स्टॉक 424 रुपयांवर बंद झाला आहे. शेअरची किंमत सकाळी 470.05 रुपयांवर होती. या संपूर्ण आठवड्यात NDTV च्या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. 25 नोव्हेंबर रोजी एनडीटीव्हीच्या शेअरची किंमत 370 रुपयांच्या जवळ होती, जी आता 424 रुपयांवर आहे. म्हणजे अवघ्या 5 दिवसांत शेअरची किंमत 16 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.

हेही वाचा: