Breaking : कर्जाचे हप्ते पुन्हा कडाडले; RBI कडून रेपो दरात वाढ!

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी आज पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर केला. रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची वाढ केली. रिझर्व्ह बँकेने (RBI) सलग तिसऱ्यांदा रेपो रेट वाढवला आहे. यावेळी रेपो दर ५० बेस पॉईंटने वाढवला आहे. यामुळे रेपो रेट ५.४ टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे कर्जे महागणार आहे. याआधी फेब्रुवारीत आरबीआयने रेपो (reverse repo rate) रेट ०.४० टक्क्याने वाढवला होता.

गेल्या सहा महिन्यांपासून महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या (reverse repo rate) अपेक्षेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे याआधी रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रणात आणण्याच्या हेतूने व्याजदरात दोन टप्प्यात 0.90 टक्क्यांची वाढ केली होती. आज पुन्हा 0.50 टक्यांची वाढ केल्याने एकून रेपो दरात तिसऱ्या टप्प्यात 1.40 टक्क्यांची वाढ होऊन 5.40 टक्के इतका झाला आहे.

२०२२-२३ मध्ये GDP वृद्धीचा अंदाज ७.२ टक्के एवढा कायम ठेवण्यात आला आहे. पहिल्या तिमाहीत १६.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.२ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.१ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४ टक्के राहण्याचा अंदाज असल्याचे दास यांनी म्हटले आहे.

 

जगाच्या तुलनेत देशांतर्गत महागाई काही प्रमाणात नियंत्रणात असली, व्याजदरवाढींमुळे लोकांचे गृहकर्जाचे हप्ते लक्षणीय प्रमाणात वाढले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आजच्या पतधोरण आढावा बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे कर्जाच्या व्याजदरात आणखी वाढ होणार आहे.

हेही वाचा :


पबमध्ये भीषण आग लागून १३ जणांचा होरपळून मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published.