बंपर कमाईचा सुपरहिट बिझनेस! सुरू करा घरबसल्या

केंद्रामध्ये मोदी सरकारकडूनही बिझनेसला प्रोत्साहन दिलं जात आहे. तसंच सरकारने स्टार्ट-अप कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजनाही लागू केल्या आहेत. त्याचा फायदा तुम्हालाही घेता येईल. कोणताही बिझनेस सुरू करण्याआधी त्याची मागणी आणि मार्केट जाणून घेणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा बिझनेसबाबत (Creative business idea) सांगणार आहोत, ज्याची मागणी गावापासून शहरापर्यंत आहे. हा LED बल्ब बनवण्याचा (LED Bulb Manufacturing) बिझनेस आहे.
LED Bulb ची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या बल्बमुळे प्रकाशही चांगला मिळतो आणि सोबतच विजेची बचत होऊन बिलही कमी येतं. या LED Bulb बिझनेस आयडियामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. त्याचं प्रशिक्षण सरकारकडून दिलं जातं.
हा बल्ब टिकाऊ असतो आणि बऱ्याच काळापर्यंत चालतो. प्लास्टिकचा असल्यामुळे हा फुटण्याची भीतीही नसते. LED म्हणजे लाइट एमिटिंग डायोड. जेव्हा इलेक्ट्रॉन अर्धवाहक पदार्थातून पास होतो तेव्हा तो छोट्या कणांना प्रकाश देतो. त्यांना एलईडी म्हटलं जातं. हे सगळ्यात जास्त प्रकाश देतात. एका LED बल्बचं आयुष्य साधारण 50,000 तास किंवा त्यापेक्षा जास्त असतं. CFL बल्बचं आयुष्य 8000 तासांपर्यंत असतं. विशेष बाब म्हणजे LED बल्ब हे रिसायकल करता येतात. LED मध्ये CFL बल्बप्रमाणे पारा नसतो; पण त्यामध्ये लेड (lead) आणि निकेल (Nickel) यांसारख्या घटकांचा समावेश असतो.
LED बल्ब बिझनेस (business idea) तुम्ही अगदी माफक गुंतवणूक करूनही सुरू करू शकता. कमी गुंतवणुकीमुळे हा बिझनेस चांगला मानला जातो. ‘मिनिस्ट्री ऑफ मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्रायजेस’अंतर्गत अनेक संस्था LED बल्ब बनवण्याचं ट्रेनिंग देतात. आता सगळीकडे स्वयंरोजगार कार्यक्रमांतर्गत LED बल्ब बनवण्याचं ट्रेनिंगही दिलं जातं. यासोबतच ज्या कंपन्या LED बल्ब बनवतात, त्यासुद्धा ट्रेनिंग उपलब्ध करून देतात. त्यांच्याशीही संपर्क साधता येऊ शकतो.
LED Bulb बनवण्याच्या ट्रेनिंगदरम्यान तुम्हाला बेसिक ऑफ LED, Basic of PCB, LED Driver, Fitting-Testing, मटेरियलची खरेदी, मार्केटींग, सरकारी सबसिडी स्कीमसोबतच अनेक गोष्टींबाबत सांगितलं जातं. तुम्हाला छोट्या स्तरावर हा बिझनेस सुरू करायचा असल्यास फक्त 50,000 रुपयांमध्ये सुरूवात करता येऊ शकते. या कामासाठी तुम्हाला कोणत्याही दुकानाची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी आरामात याची सुरुवात करू शकता.
एक बल्ब बनवण्यासाठी जवळपास 50 रुपयांपर्यंत खर्च येतो आणि बाजारात तो आरामात 100 रुपयांपर्यंत विकला जातो. म्हणजे एका बल्बवर दुप्पट नफा होतो. तुम्ही एका दिवसात 100 बल्ब बनवले तर 5000 रुपयांचं उत्पन्न थेट तुमच्या खिशात असेल. अशा परिस्थितीत दर महिन्याला 1.50 लाख रुपयांपर्यंत आरामात कमाई करता येऊ शकते.
हेही वाचा :