रक्षाबंधनपूर्वी सोने खरेदीची सुवर्ण संधी, चांदीची किंमतही कमी झाली!

रक्षाबंधनाचा सण जवळ आला असून, त्यामुळे सराफा बाजारात मोठी लगबग सुरू आहे. (buy gold) दुसरीकडे सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उतारामुळे खरेदीबाबत ग्राहकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.

रक्षाबंधनपूर्वी आज म्हणजेच बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात मजबूत डॉलरमुळे बुधवारी सोन्याच्या किमती कमी झाल्याचे दिसून आले. वायदे बाजारात बुधवारी (buy gold) सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. कमोडिटी एक्सचेंजवर(एमसीएक्स) ऑक्टोबर २०२२ मध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव २०८ रुपये किंवा ०.४० टक्क्यांनी घसरून ५२,२८१ रुपये प्रति १० ग्रॅमवर होता. मागील सत्रात सोन्याचा भाव ५२,४८९ रुपये प्रति १० ग्रॅम होता.

ऑक्टोबर २०२२ मध्ये डिलिव्हरीसाठी असलेल्या सोन्याचा भाव २०८ रुपये किंवा ०.४० टक्क्यांनी घसरून ५२,२८१ रुपये प्रति १० ग्रॅम होता. मागील सत्रात ऑक्टोबर कराराच्या सोन्याचा भाव ५२,४९८ रुपये प्रति १० ग्रॅम होता. त्याचप्रमाणे डिसेंबर कराराच्या सोन्याचा भाव २२० रुपये किंवा ०.४२ टक्क्यांनी घसरून ५२,५३१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तसेच मागील सत्रात डिसेंबर कराराच्या सोन्याचा भाव ५२,७५१ रुपये प्रति १० ग्रॅम होता.

वायदा बाजारात चांदीची किंमत
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर(एमसीएक्स) सप्टेंबर २०२२ मध्ये डिलिव्हरीसाठी असलेली चांदी ३१३ रुपयांनी किंवा ०.५३ टक्क्यांनी घसरून ५८,४७८ रुपये प्रति किलो झाली. मागील सत्रात सप्टेंबर करारातील चांदीचा भाव ५८,७९१ रुपये प्रति किलो होता. त्याचवेळी डिसेंबर २०२२ मध्ये डिलिव्हरीसाठीच्या चांदीची किंमत ३४२ रुपये किंवा ०.५७ टक्क्यांनी घसरून ५९,५९० रुपये प्रति किलो झाली. यापूर्वी सोमवारी डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी चांदीची किंमत ५९,९३२ रुपये प्रति किलो होती.

दुसरीकडे, मार्च २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठी चांदी ८८१ रुपये किंवा १.४२ टक्क्यांच्या घसरणीसह ६१,११९ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती. सोमवारी मार्च २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठी चांदीची किंमत ६२,००० रुपये प्रति किलो होती.

जागतिक स्तरावर सोन्याची किंमत
ब्लूमबर्गच्या मते कॉमेक्सवर डिसेंबर २०२२ मध्ये डिलिव्हरीसाठी सोने ०.३७ टक्क्यांनी कमी होऊन १,८०५.६० डॉलर प्रति औंसवर व्यापार करत होते. इतकेच नाही तर स्पॉट मार्केटमध्ये ०.३२ टक्क्यांच्या घसरणीसह सोन्याचा भाव १,७८८.४९ डॉलर प्रति औंस झाला.

२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध
२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानले जाते, पण या सोन्यापासून दागिने बनवता येत नाहीत कारण ते खूप मऊ असते. त्यामुळे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. २४ कॅरेट सोने ९९.९ टक्के गुणवत्ता आणि २२ कॅरेट सुमारे ९१ टक्के शुद्ध आहे. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात, तर २४ कॅरेट सोने चमकदार असते, परंतु त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

हेही वाचा :


‘भाजप जनतेला मूर्ख समजते’, संजय राठोड नेत्याचा घणाघात