गुंतवणूकदार होरपळले; बिटकॉइन ३० हजार डॉलरखाली

जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीने क्रिप्टो करन्सी (cryptocurrency)बाजारात पडझड कायम आहे. आज मंगळवारी २४ मे २०२२ रोजी बिटकाॅइन, इथेरियम, बीएनबी, टेरा यासारख्या कॉइनच्या किंमतीत घसरण झाली. मागील तीन आठवड्यात बिटकॉइनचा भाव ४० टक्क्यांपर्यंत घसरला आहे. तो ३० हजार डॉलरपर्यंत खाली आला. मागील महिनाभरात झालेल्या प्रचंड घसरणीने गुंतवणूकदारांचे मोठं नुकसान झाले.
‘कॉइनमार्केटकॅप’नुसार आज मंगळवारी बिटकॉइनच्या(cryptocurrency) किंमतीत ३.७६ टक्के घसरण झाली. एका बिटकॉइनचा भाव २९,३०९.८३ डॉलर इतका झाला. मागील ७ दिवसांत त्यात ३.८६ टक्के घसरण झाली. क्रिप्टो करन्सी बाजारातील दुसरा लोकप्रिय कॉइन असलेल्या इथेरियमच्या किमतीत आज ४.६७ टक्के घसरण झाली. एक इथेरियमचा भाव १,९७२.६९ डॉलर इतका खाली आला. मागील आठवडाभरात त्यात ५.२६ टक्के घसरण झाली.
आज सोलाना कॉइनच्या किंमतीत देखील घसरण झाली. एका सोलाना कॉइनचा भाव ४९.५० डॉलर झाला. मागील महिनाभरात तो ५० टक्क्यांनी कमी झाला आहे. आठवडाभरात त्यात ८.१४ टक्के घसरण झाली.
अल्व्हान्चे कॉइनचा भाव २८.६८ डॉलर असून त्यात ९.९५ टक्के घसरण झाली. शिबू या डिजिटल कॉइनचा भाव ०.००००११ डॉलर आहे. त्यात ५.७२ टक्के घसरण झाली. पोलकॅडॉटचा भाव ९.८७ डॉलर इतका घसरला असून त्यात ५.०७ टक्के घसरण झाली. डोजेकॉइनचा भाव ०.०८ डॉलर आहे. त्यात ४.५६ टक्के घसरण झाली आहे. तिथेर कॉइनचा भाव ०.९९ डॉलर आहे.
बीएनबीचा भाव ३२२.६५ डॉलर इतका असून त्यात २.०५ टक्के वाढ झाली. एक्सआरपी कॉइनच्या किंमतीत आज ४.३६ टक्के घसरण झाली असून एका कॉइनचा भाव ०.४० डॉलर झाला आहे. कार्डानोचा कॉइनचा भाव ०.५१ डॉलर आहे.
हेही वाचा :