1 लाखांचे थेट झाले 18 लाख, या पेनी स्टॉकने दिला बंपर रिटर्न..!

शेअर बाजारात (Share Market) किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग सातत्याने वाढत आहे. विशेषत: कोरोना काळात झपाट्याने डिमॅट खाती (Demat Account) उघडण्यात आली. किरकोळ गुंतवणूकदार ब-याचदा पेनी स्टॉक्स (Penny Stocks) शोधतात, जे उत्तम परतावा देऊन त्यांना मालामाल करतात. कवडीमोल भावात मिळणा-या या पेनी स्टॉक्सच्या परताव्याचा विचार करता, त्यांनी गुंतवणुकदार आणि विश्लेषकांना अंचबित केले आहे. त्यांनी चांगला परतावा देण्याचा विक्रम केला आहे, जो सर्वांना धक्का देणारा आहे. अत्यंत कमी गुंतवणुकीत काही दिवसांतच मालामाल होण्याचा प्रयत्न नव्याने आलेले गुंतवणुकदार करतात. अद्विक कॅपिटल Advik Capital हा असाच एक पेनी स्टॉक आहे ज्याने गुंतवणूकदारांना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिकचा परतावा दिला आहे. गेल्या 18 महिन्यात या शेअरने 1700 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे.

दीड वर्षात शेअरमध्ये 1700% वाढ
साधारण दीड वर्षांपूर्वी बीएसईवरील या शेअरची किंमत केवळ 0.29 पैसे इतकी होती. त्याची किंमत आता 4.97 रुपये झाली आहे. गेल्या आठवड्यात 12 एप्रिल रोजी हा शेअर 5.25 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या 18 महिन्यात या शेअरने 1700 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे.. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 18 महिन्यांपूर्वी या मल्टीबॅगर शेअरमध्ये केवळ 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ही गुंतवणूक कायम ठेवली असती तर या गुंतवणुकदाराला छप्पर फाडके रिर्टन्स मिळाले असते. एक लाख रुपये गुंतवणुकीवर त्याला 18 लाखांचा परतावा मिळाला असता.(demat account)

सहा महिने ते एका वर्षापर्यंत असा मिळाला परतावा
अलीकडच्या काळात या शेअरने चांगला परतावा दिला आहे. गेल्या एका आठवड्यात हा शेअर 1.22 टक्क्यांनी वधारला आहे. या एका महिन्याबद्दल बोलायचे झाले तर, या काळात अद्विक कॅपिटलच्या शेअरमध्ये जवळपास 31% वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत त्यात सुमारे 46 टक्के वाढ झाली आहे, तर यंदा आतापर्यंत हा शेअर 71 टक्क्यांनी वधारला आहे. गेल्या एक वर्षातही त्याने मल्टीबॅगर रिटर्न दिले आहेत. या काळात याच्या किंमतीत सुमारे 340 टक्क्यांनी वाढ झाली आहे

बीएसई, एनएसईला टाकले मागे
या शेअरने अजून एक विक्रम त्याच्या नावे केला आहे. बीएसई सेन्सेक्स, एनएसई निफ्टी यांंना परताव्याबाबत या शेअरने पिछाडीवर टाकले आहे. गेल्या 18 महिन्यांत स्टॉक मार्केट केवळ 50 टक्के वाढू शकले आहे. निफ्टी 50 ही फार काही कमाल दाखवू शकलेले नाही. मात्र याच कालावधीत अद्विकने विक्रम केला आहे. परताव्याच्या बाबतीत त्याने शेअर मार्केटला मागे टाकले आहे. हा शेअर 18 महिन्यांत तब्बल 1700 रुपयांनी वधरला आहे. त्याचप्रमाणे या 18 महिन्यांत बीएसई सेन्सेक्स सुमारे 48 टक्क्यांनी वधारण्यात यशस्वी झाला आहे. सध्या अद्विक कॅपिटलची मार्केट कॅप सुमारे 110 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला 15 लाख रुपयांचा नफा झाला होता, तर महसुलाचा आकडा 6.13 कोटी रुपये होता.

हेही वाचा :


लोन हवंय? चिंता सोडा, SBI कडून ग्राहकांसाठी खास ऑफर..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *