इचलकरंजी मधील उदयोजकंसाठी टाइम मॅनेजमेंट, नेटवर्किंग या विषयावर उद्योजक मेळावा !

संम्पूर्ण महाराष्ट्रातील उद्योजकांनी उद्योजकांसाठी (entrepreneur) चालवलेली चळवळ म्हणजे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट.उद्योजकता वृध्दी, टाइम मॅनेजमेंट, नेटवर्किंग व सॅटर्डे क्लब ह्या प्लॅटफॉर्म ची ओळख या विषयावर शनिवार दि. 16 एप्रिल 2022 रोजी उद्योजकांसाठी एकत्रित चर्चा व मेळावा आयोजित केल्याची माहिती इचलकरंजी चैप्टर चे चेअरपर्सन श्री सुहास पाटील श्री. विकास लोहार (सेक्रेटरी) आणि श्री. अलिम शेख (ट्रेजर्रर) यांनी दिली.
ह्या संदर्भात ते पुढे म्हणाले, उद्योजक श्री. उज्वल साठे, ( सदस्य एलीट क्लब), टाइम मॅनेजमेंट बद्दल मार्गदर्शन करणार आहेत,उद्योजक श्री. विशाल मंडलिक (रिजन हेड) क्लब विषयी माहिती देतील.
ह्या मार्गदर्शन कार्यक्रमात १०० हुन अधिक उद्योजक सहभागी होणार असुन यामध्ये सर्वांच्या व्यापाराची ओळख व रेफरन्स द्वारे व्यवसायवृध्दी हा मानस आहे. सर्व साधारण व्यावसायिक सुद्धा कोटि कोटि च्या उलाढाली, अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट व •मोठी बिजनेस डील, आपला व्यवसाय संपूर्ण भारत व भारता बाहेर ही जाऊ शकतो असे जर स्वप्न पाहत असेल तर ह्या सर्व गोष्टी, ह्या एकाच प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून अतिशय सोप्या रितीने सहज शक्य आहे.
आज फ़क्त महाराष्ट्र मध्ये ७२ हुन अधिक चॅप्टर्सद्वारे अडीच हजार हुन ही अधिक उद्योजक एकत्रित येऊन आपली स्वप्नपूर्ति करत आहेत. इचलकरंजी व परिसरातील सर्व उद्योजकांसाठी (entrepreneur) हीच सोन्याची संधी उपलब्ध करण्यासाठी हा मेळावा रूनवाल टॉवर, PNG ज्वेलर्स बिल्डिंग, दूसरा मजला, इचलकरंजी येथे शनिवारी 16 अप्रैल 2022 रोजी संध्याकाळी 4 वाजता आयोजित केला आहे!
अधिक माहिती व रेजिस्ट्रेशन साठी संपर्क : 9730235864/8208318851
हेही वाचा :