‘या’ शेअरमध्ये 30 टक्के रॅलीची अपेक्षा…

shares in stock market

Shyam Metalics and Energy (SMEL) च्या शेअर्समध्ये (shares) 2022 मध्ये आतापर्यंत 9 टक्क्यांची घसरण झाली आहे. हा स्टॉक जून 2021 रोजी बाजारात लिस्ट झाला होता. स्टॉकची लिस्टिंग झाल्यापासून 17 टक्क्यांनी घट झाली आहे आणि सध्या 306 रुपयांच्या त्याच्या IPO इश्यू किंमतीच्या जवळ व्यवहार करत आहे.

ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने SMEL मध्ये BUY रेटिंगसह त्यासाठी 400 रुपयांचे टार्गेट दिले आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजचा असा विश्वास आहे की सध्याच्या पातळीपासून या स्टॉकमध्ये 30 टक्के वाढ अपेक्षित आहे.

श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी ही कोलकात स्थित कंपनी आहे जी लाँग स्टील प्रोडक्ट्स आणि सेरोअॅलॉय बेस्ड प्रोडक्ट बनवते आणि संपूर्ण स्टील व्हॅल्यू चेनमध्ये इंटरमीडिएट आणि फायनल प्रोडक्ट विकते.(shares)

आयसीआयसीआय सिक्युरिटीचे म्हणणे आहे की कंपनीचे बिझनेस मॉडेल अतिशय मजबूत आणि किफायतशीर आहे. कंपनीला आपला खर्च नियंत्रणात ठेवण्यातही चांगले यश मिळाले आहे. मात्र कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे त्यातही धोके निर्माण होत आहेत. आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीच्या नफ्यातही चांगली वाढ झाली आहे. याशिवाय, कंपनी आपल्या 3 पैकी 2 प्लांटच्या क्षमता विस्तारावर काम करण्याची तयारी करत आहे. यासाठी कंपनी 40 अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या या प्लॅनचे फायदे पुढे जाताना दिसतील. हे लक्षात घेऊन हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो आहे.

कंपनी आपली क्षमता वाढवण्यावर भर देत आहे. याशिवाय, उत्पादन वाढवताना खर्च नियंत्रणात ठेवण्याच्या कंपनीच्या धोरणामुळे आर्थिक कामगिरीत सातत्यपूर्ण सुधारणा झाली आहे. कंपनीची आर्थिक स्थिती चांगली आहे. जे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून एक उत्तम पर्याय आहे.

हेही वाचा :


Maggi आवडते? मग ही बातमी नक्की वाचा..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *