एफडीवरील व्याजदरात वाढ! या बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर!

HDFC बँकेनंतर आता आणखी एका खाजगी बँकेने कोट्यवधी ग्राहकांना खुशखबर दिली आहे. पूर्वी ही बँक सरकारी होती. पण आता ती खाजगी बँक झाली आहे. (interest rates on fd)

20 एप्रिलपासून बदल लागू
IDBI बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे. त्यानंतर आता (interest rates on fd) एफडी करणाऱ्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे. व्याजदरातील बदल 20 एप्रिलपासून लागू होणार आहे.

किमान व्याज दर 2.70 टक्के
बदलानंतर, IDBI बँक 6 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 2.70 टक्के ते 5.60 टक्के व्याज देत आहे. यापूर्वी आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेनेही एफडी ठेवींवरील व्याजात वाढ केली आहे.

IDBI बँकेने 7 दिवसांपासून 30 दिवसांपर्यंतच्या 2 कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 2.7 टक्के पहिला व्याजदर कायम ठेवला आहे. 31 दिवस ते 45 दिवस या कालावधीत आता 2.80. टक्क्यांऐवजी 3 टक्के व्याज मिळेल.

IDBI बँक FD व्याजदर नवीन व्याजदर
– 7-14 दिवस: 2.7 टक्के
– 15-30 दिवस: 2.7 टक्के
– 31-45 दिवस: 3 टक्के
– 46-60 दिवस: 3.25 टक्के
– 61-90 दिवस: 3.4 टक्के 3.9
– 91 दिवस ते 6 महिने: 3.75 टक्के
– 6 महिने ते 270 दिवस: 4.4%
– 271 दिवस ते 1 पेक्षा कमी: 4.5 टक्के
– 1 वर्षासाठी : 5.15 टक्के
– 1 वर्ष ते 2 वर्षे: 5.25 टक्के
– 2 वर्षे ते 3 वर्षे: 5.35 टक्के
– 3 वर्षे ते 5 वर्षे: 5.5 टक्के
– 5 वर्षांसाठी : 5.6%
– 5 वर्षे ते 7 वर्षे: 5.6%
– 7 वर्षे ते 10 वर्षे: 5.5 टक्के

हेही वाचा :


मोठी बातमी! MHT CET Exam 2022 पुढे ढकलली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *