बँंकेची कामे उद्याच उरकून घ्या; सलग तीन दिवस बँंका बंद..!

३१ मार्चनंतर आपण या वर्षाच्या चौथ्या महिन्यात म्हणजेच एप्रिल २०२२ मध्ये प्रवेश करणार आहोत. नवीन आर्थिक वर्ष एप्रिलपासून सुरू होणार आहे. (tomorrow bank open)त्याचवेळी बँकेच्या सुट्ट्यांसह महिना सुरू होत आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात सलग तीन दिवस बँका बंद राहतील. त्यामुळे तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असल्यास ते बुधवारी (३० मार्च) आणि गुरुवारी (३१ मार्च) पूर्ण करा, नाहीतर तुम्हाला बराच वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते.

बँक सलग ३ दिवस बंद राहतील (tomorrow bank open)
१ एप्रिल – बँक खात्यांचे वार्षिक बंद (क्लोजिंग)
२ एप्रिल – गुढी पाडवा
३ एप्रिल – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

एप्रिलमध्ये बँका एकूण १५ दिवस बंद राहतील
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एप्रिल २०२२ च्या बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार देशभरात विविध ठिकाणी एप्रिलमध्ये एकूण १५ दिवस बँका बंद राहणार आहेत. तर महाराष्ट्रात १० दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे.

सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे –
१ एप्रिल : बँक खात्यांचे वार्षिक बंद (क्लोजिंग)
२ एप्रिल : गुढी पाडवा/ उगादी सण/ पहिला नवरात्र/ तेलुगु नववर्ष दिन/ साजिबू नोंगमापनबा
३ एप्रिल : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
९ एप्रिल : महिन्याचा दुसरा शनिवार
१० एप्रिल : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१४ एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/ महावीर जयंती/ बैसाखी/ तमिळ नववर्ष दिन/ चेराओबा/ बिजू उत्सव/ बोहाग बिहू
१५ एप्रिल : गुड फ्रायडे/ बंगाली नवीन वर्षाचा दिवस (नबावर्षा) / हिमाचल दिवस/ विशू/ बोहाग बिहू
१७ एप्रिल : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
२३ एप्रिल : महिन्याचा चौथा शनिवार
२४ एप्रिल : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

हेही वाचा :


‘ऐश्वर्या रायसकटच तुझं सगळं सत्य बाहेर आणेन’;

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *