state bank of india | ‘एसबीआय’ने उचललं मोठं पाऊल..!

state bank of india

स्टेट बँक ऑफ इंडियाने (state bank of india) आघाडीच्या पाच गृह वित्त कंपन्याशी (एचएफसीज) करार केला असून त्यात पीएनबी हाउसिंग फायनान्स लिमिटेड, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड, श्रीराम हाउसिंग फायनान्स लिमिटेड, एडेलवाइज हाउसिंग फायनान्स लिमिटेड आणि कॅप्री ग्लोबल हाउसिंग फायनान्स लिमिटेड यांचा समावेश आहे. या कराराअंतर्गत आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार वंचित व दुर्लक्षित घटकांना गृह कर्ज मंजूर केले जाणार आहे.

परवडणाऱ्या घरांचा अभाव ही भारतापुढची मोठी समस्या आहे, विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत गट (ईडब्ल्यूएस) आणि समाजातील अनौपचारिक गटाला ही समस्या जास्त प्रमाणात जाणवते. या क्षेत्रातील सेवेची व्याप्ती विस्तारण्यासाठी एसबीआय (state bank of india) वेगवेगळ्या एचएफसीसह सह- कर्जपुरवठ्याच्या संधींच्या शोधात आहे.

या भागिदारीविषयी एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले, या सहकार्यामुळे आम्ही वंचित तसेच दुर्लक्षित गटातील जास्तीत जास्त गृह कर्जदारांपर्यंत पोहोचून कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यामुळे आमचे वितरण नेटवर्क विस्तारण्यास मदत होईल. अशाप्रकारच्या भागिदारी
भारतातील लहान गटातील घर खरेदीदारांपर्यंत पोहोचून त्यांना प्रभावी व परवडणारे कर्ज उपलब्ध करून देत ‘२०२४ पर्यंत सर्वांसाठी घर’ या धोरणाला योगदान देण्याच्या आमच्या बांधिलकीशी सुसंगत आहे.

आरबीआयने बँका, एचएफसीज/एनबीएफसीजसाठी प्रायोरिची क्षेत्रासाठी सह- कर्जपुरवठ्याशी संबंधित मार्गदर्शक तत्वे जारी केली
असून त्यामागे अर्थव्यवस्थएतील वंचित व दुर्लक्षित घटकांना मिळणाऱ्या कर्जपुरवठ्यात वाढ व्हावी आणि कर्जदारांना परवडणाऱ्या किंमतीत निधी उपलब्ध व्हावा असे उद्दिष्ट आहे. को- लेंडिंग मॉडेलमुळे कर्जदाराला सर्वोत्तम व्याजदर आणि अधिक चांगली व्याप्ती मिळते.

state bank of india

श्रीराम हाऊसिंग फायनान्सचा एसबीआयशी करार
श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या अग्रगण्य परवडणाऱ्या गृहनिर्माण वित्त कंपनीने आज प्राधान्य क्षेत्रातील परवडणाऱ्या गृहकर्जांसाठी भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सोबत सह-कर्ज करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या २०:८० को-लेंडिंग मॉडेल (CLM) नुसार दोन्ही संस्था संयुक्तपणे गृहनिर्माण कर्ज ग्राहकांना सेवा देतील. श्रीराम समूहाचा एक भाग, श्रीराम हाऊसिंग फायनान्स ही भारतातील सर्वात मोठी परवडणारी गृहनिर्माण फायनान्सर आणि या विभागातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी SBI सोबतच्या या सह-कर्ज व्यवस्थेअंतर्गत परवडणाऱ्या गृहनिर्माण विभागातील प्राधान्य क्षेत्रातील गृहकर्जांना लक्ष्य करेल. श्रीराम हाउसिंग फायनान्स कर्जाची उत्पत्ती, प्रक्रिया आणि सेवा करेल.

हेही वाचा :


कोणी पाठीत खंजीर खुपसला, हे मतदार राजा ठरवेल..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *