सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी..!

कमाॅडिटी बाजारात (commodity market) सोने आणि चांदीच्या किंमतींत आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. आज मंगळवारी एमसीक्सवर सोन्याचा भाव ४६० रुपयांनी कमी झाला तर चांदी ९७२ रुपयांची घसरण झाली. सलग तीन सत्रात सोन्याचा भाव ९२६ रुपयांनी कमी झाला आहे. तर याच तीन दिवसांत चांदी तब्बल २०८० रुपयांची घसरण झाली आहे.
सध्या मल्टी कमाॅडिटी (commodity market) एक्सचेंजमध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१११६ रुपये असून त्यात ४५६ रुपयांची घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६७१३३ रुपये असून त्यात ९७२ रुपयांची घसरण झाली. यापूर्वी कमाॅडिटी बाजारात शुक्रवारी आणि काल सोमवारी सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली होती.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज मंगळवारी २९ मार्च रोजी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७७५० रुपये इतका आहे. त्यात २०० रुपयांची घसरण झाली. सोमवारी २५० रुपयांनी स्वस्त झाले होते. २४ कॅरेट सोन्याचा मुंबईतील भाव ५२१०० रुपये इतका खाली आला आहे. आज दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७७५० रुपये इतका आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ५२१०० रुपये इतका आहे.
आज चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४७९६० रुपये इतका असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५२३२० रुपये आहे. त्यात ३३० रुपयांची घसरण झाली आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७७५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५२१०० रुपये इतका आहे. सलग दोन सत्रात सराफा बाजारात सोन्याचा भाव ५०० रुपयांनी कमी झाला आहे.
जागतिक कमाॅडिटी बाजारात आज स्पॉट गोल्डचा भाव १९४७.९० डॉलर इतका खाली आला. त्यात ०.५ टक्के घसरण झाली. यूएस गोल्ड फ्युचर्सचा भाव १९२२.६७ डाॅलर आहे. चांदीचा भाव २५.२१ डॉलर प्रती औंस इतका आहे. रशिया आणि युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूने चर्चेची तयारी दर्शवण्यात आली आहे. त्यामुळे कमाॅडिटी बाजारात पडसाद उमटले.
तीन सत्रात सोनं ९२६ रुपयांनी झाले स्वस्त
आज सोन्याचा भाव ४६० रुपयांनी कमी झाला आहे. एमसीएक्सवर काल सोमवारी सोन्याचा भाव २७६ रुपयांनी कमी झाला होता. तर शुक्रवारी सोने १९० रुपयांनी स्वस्त झाले होते. सलग तीन सत्रात सोनं ९२७ रुपयांनी स्वस झाले. चांदीमध्ये कालच्या सत्रात ६६० रुपयांची घसरण झाली होती तर शुक्रवारी चांदीमध्ये ४४८ रुपयांनी स्वस्त झाली होती. रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली होती. भारतीय कमाॅडिटी बाजारात सोन्याचा भाव ५५६०० रुपयांवर गेला होता.