सोनं-चांदी महागलं की स्वस्त झालं? जाणून घ्या आजचे दर

gold

 सोने (gold) चांदीच्या दरात चढउतार होत असतात. त्यानुसार सोन्या-चांदीच्या भावात बदल होत असतो. मात्र, आज म्हणजेच 27 एप्रिल रोजी देशात सोन्याच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 49,300 आहे, कालसुद्धा सोनं याच किमतीने विकलं जात होते.

24 कॅरेट सोन्याची किंमत-

आज देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 53,780 रुपये आहे. कालसुद्धा सोनं (gold) याच भावानं विकलं जात होता. वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

चांदीच्या भावात घसरण-

चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 67,100 आहे. त्याच वेळी, ही किंमत काल 67,400 होती. म्हणजेच चांदीच्या दरात प्रतिकिलो 300 रुपयांची घसरण दिसून आली आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *