सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण!

तुम्हाला सोने-चांदी (gold silver rates)  खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जागतिक बाजारातून मिळालेल्या संकेतांमुळे बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली.भारतीय बाजारातील सोन्याच्या भावात आज ०.३ टक्क्यांची घसरण झाली. इतकेच नाही तर गेल्या चार दिवसांत सोन्याचा भाव 500 रुपयांनी खाली आला आहे.

आज सोन्याचा भाव किती आहे?

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोनं प्रति 10 ग्रॅम 50,610 रुपये झाले, तर चांदी 1.3 टक्क्यांनी घसरून 60,494 रुपये प्रति किलोवर आले आहे. आठवड्यातील चौथ्या व्यवहारात सोन्याच्या दरात घसरण झाली.(gold silver rates)

सोने विक्रमी उच्चांकावरून 5,500 हून अधिक खाली आले

सोने त्याच्या विक्रमी उच्चांकापेक्षा 5500 पेक्षा जास्त स्वस्त झालं आहे. सोन्याचा भाव गेल्या काही दिवसात 56,200 च्या पातळीवर पोहोचला होता. सध्या सोन्याचा भाव 50,610 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

सोने महाग होऊ शकते

जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आणि आज सकाळी अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.3 टक्क्यांनी घसरून $1,827.03 प्रति औंस झाली आहे. सोन्याच्या किंमतीत ही घसरण डॉलरच्या मजबूतीमुळे झाली आहे, जो सध्या 20 वर्षांच्या उच्चांकावर आहे. येत्या काळात डॉलरचे दर घसरला तर सोने पुन्हा महाग होईल.

जागतिक बाजारात सोने स्वस्त, चांदी महाग

भारतीय बाजारात सोन्याचा भाव 50 हजारांच्या वर राहील, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुढील काही दिवस सोन्याची किंमत 50,440-50,110 रुपयांच्या दरम्यान व्यवहार करेल, असा अंदाज आहे. चांदीची किंमत 60,420-59,550 रुपयांपर्यंत राहू शकते. म्हणजेच आगामी काळात सोन्या-चांदीच्या किमतीत फारसा बदल होणार नाही.

हेही वाचा :


सांगली : डॉक्टराला मारहाण; ९ लाखांची खंडणी वसूल!

Leave a Reply

Your email address will not be published.