SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी..!

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI च्या ग्राहकांसाठी (sbi customer) एक आनंदाची बातमी आहे. कारण, बँकेने २ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याजदरात (Domestic Bulk Term Deposits) वाढ केली आहे. यामध्ये बल्क मुदत ठेवी या ४०-९० बीपीएसने वाढल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपासून नवे दर लागू झाले आहेत.
खरंतर, RBI ने नुकतेच रेपो रेट ४० बीपीएसने वाढवला होता. यामुळेच SBI ने देशांतर्गत मोठ्या प्रमाणात मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर यासंबंधी माहिती दिली आहे.(sbi customer)
बँकेने सात ते ४५ दिवसांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर तीन टक्क्यांवरच ठेवला आहे. तर ४६ ते १७९ दिवसांसाठी तो ३ टक्क्यांवरून ३.५ टक्के करण्यात आला आहे. १८० ते २१० दिवसांच्या कालावधीत ठेवींवरील व्याजदरात ४० बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. २११ दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर ३.३ टक्क्यांवरून ३.७५ टक्के करण्यात आला आहे.
मार्चमध्ये वाढले होते दर
SBI ने एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवरील व्याजदर ३.६ टक्क्यांवरून ४ टक्के केला आहे. दोन वर्षे ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर ३.६ टक्क्यांवरून ४.२५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यात ६५ बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. बँकेने तीन वर्ष ते पाच वर्षांपेक्षा कमी आणि पाच वर्ष ते १० वर्षांच्या कालावधीसाठी ३.६ टक्क्यांवरून ४.५ टक्के व्याजदर वाढवला आहे. ज्येष्ठ नागरिकांना नियमित दरापेक्षा ०.५० टक्के अतिरिक्त दर दिला जाईल.
याआधी मार्चमध्येच बँकेने मोठ्या प्रमाणात मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली होती. यानंतर बँकेने २० ते ५० बेसिस पॉइंट्सने दर वाढवले. बँकेने यावेळी २११ दिवस ते एक वर्ष मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर ३.१ वरून ३.३० टक्क्यांपर्यंत वाढवले. त्याचप्रमाणे, एक वर्ष ते १० वर्षे कालावधीच्या विविध बल्क मुदत ठेवींवरील व्याजदर ३.१० टक्क्यांवरून ३.६० टक्के करण्यात आले आहेत. हे व्याजदर १० मार्च २०२२ पासून लागू करण्यात येणार आहे.
हेही वाचा :