Google Pay द्वारे एका दिवसासाठी किती रुपये करता येतात ट्रान्सफर?

money transfer

ऑनलाइन ट्रान्झेक्शनमध्ये (money transfer) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात गुगल पे (Google Pay) अतिशय पॉप्युलर UPI बेस्ड मनी ट्रान्सफर App आहे. Google Pay चा मोठा युजर आहे. तसंच वापरायलाही हे सोपं असल्याने अनेकजण Payment App म्हणून याचा वापर करतात. पण एकावेळी Google Pay द्वारे किती रुपये ट्रान्सफर करता येतात?

Google Pay ने एका दिवसासाठी अर्थात सिंगल डे ट्रान्झेक्शन लिमिट ठेवलं आहे. त्याशिवाय तुम्ही एका दिवसात किती रुपये ट्रान्सफर करू शकतात यावरही Google Pay ने लिमिट ठेवलं आहे. Google Pay वर तुम्ही एका दिवसात 1 लाख रुपयांपर्यंत पैसे पाठवू शकता. Google Pay वर एका दिवसात मॅक्सिमस 10 ट्रान्झेक्शन करतात येतात.

तसंच तुम्ही एका दिवसांत 2000 रुपयांहून अधिकची रिक्वेस्ट करू शकत नाहीत. पैसे ट्रान्सफर (money transfer) करण्यासाठी Google Pay ला आपल्या लिमिटशिवाय काही बँक लिमिट्सही असतात.

प्रत्येक बँकेचं लिमिट वेगवेगळं असतं. बँक लिमिटबाबत बँकेच्या वेबसाइटवर माहिती मिळू शकते. त्याशिवाय सिस्टमला रिसिव्हरच्या अकाउंटमध्ये काही सप्सेशियस, संशयास्पद अॅक्टिव्हिटी दिसल्यास ट्रान्झेक्शनला होल्ड करुन याबाबत माहिती मिळवता येते.

Google Pay चं लिमिट संपल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसापर्यंत वाट पाहू शकता. त्याशिवाय इतर पेमेंट मेथेड ऑनलाइन नेट बँकिंग (Online Net Banking) किंवा NEFT चा वापर करू शकता. Google Pay UPI लिमिट वाढवण्यासाठी कोणताही इतर पर्याय नाही.


हेही वाचा :


ॲव्हरेज ३१ च्या घरात ! ‘या’ ३ बेस्ट कार माहीत आहेत का ?


दाऊदच्या माणसाला साथ देणाऱ्या शिवसेनेचा रंग फिका..!


Tiger Shroff पुन्हा एकदा करणार ‘हिरोपंती’

Leave a Reply

Your email address will not be published.