‘या’ सर्वात मोठ्या बँकेने आपल्या बचत खात्यावरील व्याजदर वाढवले!

खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या (hdfc bank) बँकेने बचत खात्यांच्या व्याजदरात बदल केला आहे. सुधारित दर 6 एप्रिल 2022 पासून लागू झाला आहे. HDFC बँक 50 लाखांपेक्षा कमी बचत खात्यांवर 3% वार्षिक व्याजदर देत आहे.

50 लाखांपेक्षा जास्त डिपॉझिट असलेल्या बचत खात्यावरील व्याजदर 3.50 टक्के असेल.

यासोबतच (hdfc bank)बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरातही वाढ केली आहे. बचत खात्यावरील व्याजदर खालीलप्रमाणे सुधारित केले आहेत-

बचत खात्यांचे नवीन व्याजदर असे आहेत
50 लाखांपेक्षा कमी: 3%
50 लाखांपेक्षा जास्त: 3.50%

बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बचत खात्यांवरील नवीन व्याजदर देशांतर्गत तसेच नॉन रेजिडेंट आर्डिनरी अकाउंट्स (NRO) आणि नॉन रेजिडेंट एक्सटर्नल अकाउंट्स (NRE) वरही लागू होतील. NRO खाते कोणताही अनिवासी भारतीय कमावलेले पैसे भारतात जमा करू शकतो. हे उत्पन्न भाडे, पेन्शन किंवा इतर कोणतेही उत्पन्न असू शकते. बचत खात्यातील व्याज तुमच्या खात्यातील डेली बॅलन्सच्या आधारावर मोजले जाईल. बँक ते तिमाही अंतराने भरेल.

FD चे व्याजदर वाढले
HDFC बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FDs वरील व्याजदरातही वाढ केली आहे जी 1 ते 2 वर्षात मॅच्युर होतील. नवीन दर 6 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहेत. या वाढीनंतर, बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीत मॅच्युर होणाऱ्या डिपॉझिटसवर 2.5 टक्के ते 5.6 टक्के व्याजदर देते.

हेही वाचा :


राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *