सिमेंट उद्योग हादरला! पाहा नेमकं कारण काय ?

भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे, रस्ते, इमारती आदींची बांधकामे सुरु असताना सिमेंट उद्योग जगतात मोठी घडामोड घडू लागली आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी होल्कीम ग्रुपने (Holcim Group) भारतातील १७ वर्षांत उभारलेला डोलारा गुंडाळण्याची तयारी सुरु केली आहे.

या कंपनीने कोअर मार्केटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ग्लोबल स्ट्रॅटेजी तयार केली आहे. यानुसार भारतातून बाहेर पडणे हे या नितीचाच भाग आहे. या विषयाशी संबंधीत सूत्रांनी सांगितले की, अंबुजा सिमेंट, एसीसी लिमिटेड या दोन्ही भारतात लिस्टेड कंपन्यांना होल्कीम ग्रुपने विक्रीसाठी ठेवले आहे. (holcim group)

होल्कीम ग्रुप आपला भारतातील व्य़वसाय विकण्यासाठी जेएसड्ब्लू आणि अदानी ग्रुपसह अन्य कंपन्यांशी चर्चा करत आहे. जेएसडब्ल्यू (JSW) आणि अदानी (Adani Group) यांनी काही काळापूर्वीच सिमेंट उद्योगात एन्ट्री केली आहे. दोन्ही उद्योग समुहांनी या उद्योगात मोठी झेप घेण्याची तयारी केली आहे. मात्र, असे असले तरी श्री सिमेंटसारख्या कंपन्यांशीही संपर्क साधण्यात आला आहे.

 

भारतीय सिमेंट बाजारात आदित्य बिर्ला यांची अल्ट्राटेक कंपनी सर्वात मोठी कंपनी आहे. अल्ट्राटेक दरवर्षाला 117 दशलक्ष टन सिमेंटचे उत्पादन घेऊ शकते. Holcim Group च्या दोन्ही एसीसी आणि अंबुजा सिमेंटची उत्पादन क्षमता ६६ दशलक्ष टन आहे. जो कोणी या दोन्ही कंपन्या खरेदी करेल तो भारतीय बाजारात अचानक दबदबा निर्माण करेल. नंबर दोनवर येऊन पोहोचेल. भारतीय बाजारावर लक्ष ठेवून असलेल्या परदेशी कंपन्यांकडेही मूळ कंपनी प्रस्ताव घेऊन गेली आहे.

Holcim बाबत थोडेसे…
Holcim ही मूळची स्वत्झर्लंडची कंपनी आहे. तिला फ्रान्सच्या बड्या कंपनीने Lafarge विकत घेतले आणि विलिनीकरण केले. यामुळे या कंपनीचे नाव LafargeHolcim असे झाले आणि जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी बनली. या कंपनीने युरोपसह आशियाच्या बाजारातील कंपन्या ताब्यात घेण्यासाठी कायद्यानुसार काही मालमत्ता विकल्या. आशियाई बाजारातील कायद्यानुसार काही बदल करत Holcim Group अशा नावाने रिब्रँड करण्यात आले. Ambuja Cement मध्ये या कंपनीचे 63.1 टक्के समभाग आहेत. यापैकी अंबुजा सिमेंटचे एसीसी मध्ये ५० टक्के समभाग आहेत. या विक्री प्रकरणावर कंपनीने आम्ही अफवांवर बोलत नाही एवढेच उत्तर दिले आहे.

हेही वाचा :


अभिनेत्रीचा लेटेस्ट बोल्ड अंदाज सोशलवर तुफान व्हायरल..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *