या पेनी स्टॉकची घोडदौड,गाठले अप्पर सर्किट..!

upper circuit stocks today

शुक्रवारी भारतीय बाजाराने (upper circuit stocks today) काहीशी अस्थिरता अनुभवली. सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात काहीशा तेजीसह झाली. मात्र सुरुवातीचा नफा काही क्षणापुरतीच राहिला. बँक, वाहन, एफएमसीजी, माहिती तंत्रज्ञान आणि आषधनिर्माण क्षेत्र स्थिर व्यवहार करत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या शुक्रवारच्या पतधोरणाच्या घोषणेपूर्वी ही अस्थिरता आहे.

बीएसई सेन्सेक्स तेजीत होता. सकाळी २३ अंकांनी वाढून तो ५९,०५८.८२ वर आहे. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक लाभ मिळवणारे शेअर हे डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील आणि विप्रो आदी आहेत. तर एनटीपीसी, एचडीएफसी, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक आणि टीसीएस या शेअरमध्ये घसरण नोंदली जात आहे. बीएसई मिडकॅप १७५ अंकांनी वाढला आहे आणि २५,२४५.३० वर आहे. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक २३६ अंकांनी वाढला आणि २९,७११.४० वर आहे.(upper circuit stocks today)

निफ्टी५० निर्देशांक १८ अंकांनी वाढला असून तो १७,६५८.४५ अंकांवर आहे. बँक निफ्टी २५ अंकांनी घसरून ३७,५३१.६५ वर व्यवहार करत आहे. निफ्टी५० इंडेक्समध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, कोल इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील आणि डॉ रेड्डी लॅबोरेटरीज हे शेअर तेजीसह व्यवहार करत आहेत. सिप्ला, एनटीपीसी, एचडीएफसी, टेक महिंद्रा आणि एचडीएफसी बँक हे शेअर घसरणीसह व्यवहार करत आहेत.

आठवड्याच्या अखेरच्या सत्राच्या सुरुवातीला अप्पर सर्किटमध्ये झेपालेल्या काही पेनी स्टॉकची यादी पुढीलप्रमाणे आहे. आगामी सत्रांसाठी गुंतवणूकदारांनी या समभागांवर नजर ठेवायला हवी –

शेअर सद्य मूल्य (रु.) किंमत वाढ (%)
निप्पॅन इंडिया ९.९० १०.००
टीसीआय फाय. ७.७६ ९.९२
एक्सेल ९.११ ९.८९
कौशल्या इन्फ्रा. ५.१४ ९.८३

हेही वाचा:


मराठमोळ्या अभिनेत्रीचा साडीत हटके अंदाज..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *