“या वर्षी एवढा टॅक्स कसा काय लागला? या वर्षी एवढे कागदपत्रे का मागत आहे? मागच्या वर्षी तर नव्हते मागितले”

वरील वाक्ये या वर्षी प्रत्येक कर सल्लागाराच्या/वकिलाच्या/सिएच्या ऑफिस मध्ये करदात्या कडून ऐकायला मिळत आहेत, तर मित्रानो लक्षपूर्वक खालील माहिती वाचा- annual information statement

इनकम टॅक्स डिपार्टमेंट ने अशी साईट विकसित केली आहे की प्रत्येक PAN/AADHAR नंबर वर होणारा आर्थिक व्यवहार आता सहजपणे आयकर खात्याला विनासायास प्राप्त होत आहेत

सदर व्यवहाराचे संपुर्ण माहिती A.I.S. म्हणजेच Annual Information Statement व T.I.S. म्हणजेच Taxpayers Information Summery व सोबतच 26 AS या माहिती पत्रकात Income Tax च्या साईट वर उपलब्ध आहेत .

रिटर्न भरण्यापूर्वी करदात्याला त्याच्या सगळ्या प्रकारच्या आर्थिक व्यवहाराची माहिती पडताळून पाहण्यासाठी व त्या अनुषंगाने आपापले इनकम टॅक्स रिटर्न भरणे सोपे जावे यासाठी ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे

मागील वर्षीपासून Income Tax Return भरण्यापूर्वी वरील सदर माहिती आपल्या रिटर्न मध्ये दाखविणे अनिवार्य झाले आहे

सहसा नोकरपेशा करदाते फक्त सॅलरी बेस वर आपापले रिटर्न आज पर्यंत भरत आले असावेत

एकदा Form No 16 दिला किंवा पगाराची माहिती दिली की सुटलो असा समज असे

थोड्याबहुत प्रमाणात व्यापारी/व्यवसायी वर्गात पण हेच चित्र असायचे

परंतु आता मात्र यापुढे ताकच काय पाणी सुध्दा फुंकून प्यावे लागेल – annual information statement

कोणत्याही करदात्यांनी AIS व TIS मधील माहिती न पडताळता रिटर्न भरले तर त्याला इनकम टॅक्स ऑफिस कडून नोटीस येऊ शकते

इनकम टॅक्स हा सर्व मार्गातून मिळालेल्या इनकम वर लागत असतो , मग ते शेती सोडून कोणतेही उत्पन्न असो

उपरोक्त AIS व TIS मध्ये खालील काही मोजक्या व महत्वाच्या आर्थिक व्यवहाराची माहिती उदाहरणा दाखल दिलेली आहेत

बँकेतील बचत खात्या वरील व्याज

बँकेतील Fixed Deposit / Term Deposit वरील व्याज

पगारापासून मिळणारे उत्पन

Shares ची खरेदी व विक्री

Mutual Fund ची खरेदी व
विक्री

SIP म्हणजेच Systematic Investment Plan

बॉण्ड चा व्यवहार

पोस्ट ऑफिस मधील व्यवहार

चल ,अचल स्थावर मालमत्तेची खरेदी किंवा विक्री

वेगवेगळ्या कंपन्यांचे Divident

कमिशन

10 लाखवरील सर्वच प्रकारचे व्यवहार

SFT म्हणजेच Specified Financial Transactions

करकपात झालेले म्हणजेच TDS केलेले सर्वच प्रकारचे व्यवहार

इत्यादी….. इत्यादी …..
इत्यादी…. 50 पेक्षा जास्त प्रकारच्या आर्थिक व्यवहाराची माहिती उपरोक्त AIS व TIS मध्ये असल्याने
रिटर्न भरताना सदर माहिती लपविल्या जाऊच शकत नाही आणि त्या आधारावर येत असलेला टॅक्स भरावाच लागेल हे पक्के ध्यान्यात ठेवावे लागेल

मागील वर्षापर्यंत अनेक प्रकारची माहिती लपविल्या जाऊ शकत होती सहसा Shares किंवा Mutual Fund चे व्यवहार लपविल्या गेल्याचे प्रकर्षांने निदर्शनास आले आहेत

पण तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली आहे त्यामुळे सगळ्याच व्यवहारावर CC TV लागले आहेत असे समजले तरी गैर होणार नाही

येणाऱ्या काही दिवसात याची आणखी व्याप्ती वाढलेली दिसेल

त्यामुळे येईल तो टॅक्स भरून शांत झोप घेणे कधीही चांगलेच राहील करचोरी करणे आता सोपे राहिले नाही

याचा अर्थ हा नाही की आपण व्यवहार किंवा व्यापार करू नये किंवा करताना भीती बाळगुन व्यवहार करावे. असे अजिबात नाही . सर्वच व्यवहार सुरळीतपणे चालू राहू द्यावे

फक्त आता आर्थिक शिस्त लावणे गरजेचे झाले आहे एवढेच

कायदेशीर मार्गे कर वाचविण्याचे सर्वच पर्याय नियमा प्रमाणे उपलब्ध राहणारच आहे

आता राष्ट्र प्रथम ही भावना लक्षात घेऊन समर्पित भावनेने कर भरून राष्ट्रिय कर्तव्य मात्र पार पाडावे लागेल
आयकर विवरण पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख ३१/०७/२०२२ आहे. त्यानतंर रु.१०००/- किंवा 5000/- दंड आहे.

हेही वाचा :


RBI ची मोठी कारवाई! ‘या’ ४ बड्या बँकांवर लादले निर्बंध; पैसे काढण्यावरही मर्यादा

Leave a Reply

Your email address will not be published.