Reliance Jio युझर्सची बल्ले बल्ले; १ वर्षापर्यंत रिचार्जपासून सुटका..!

जर तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक असाल आणि तुम्ही ओटीटी सबस्क्रिप्शन (ott subscription) असलेलं पॅक पाहत असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे.
चित्रपट आणि टीव्ही शो पाहण्यासाठी OTT प्लॅटफॉर्मची मागणी सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, अनेक दूरसंचार कंपन्यांच्या प्रीपेड प्लॅन्समध्ये वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन (ott subscription) विनामूल्य दिलं जातं.
जर तुम्ही रिलायन्स जिओचे (Reliance Jio) यूजर असाल आणि असाच प्लॅन शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला Reliance Jio च्या १ वर्षाच्या वैधतेसह आणि Disney + Hotstar च्या प्लॅन्सबद्दल सांगत आहोत.
2999 रुपयांचा हा कंपनीचा लोकप्रिय प्रीपेड प्लॅन आहे, ज्याची वैधता एका वर्षाची आहे. यामध्ये तुम्हाला 365 दिवसांसाठी दररोज 2.5 जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 912.5 GB डेटा मिळेल.
यामध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 मेसेजेसची सुविधा देण्यात येते. खास गोष्ट म्हणजे तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टारची प्लॅनमध्ये 1 वर्षासाठी सबस्क्रिप्शन दिलं जातं. याशिवाय तुम्हाला Jio अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळते.
हेही वाचा :