गेल्या 1 वर्षात ‘या’ Penny Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

Penny Stock

Penny Stock : गेले काही दिवस शेअर बाजारात जोरदार घसरण सुरू आहे. जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम आता भारतीय बाजारातही दिसून येतो आहे. मात्र असे असूनही काही शेअर्स गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहेत.

कारण या घसरत्या बाजारातही या शेअर्समध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. ग्रीनक्रेस्ट फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीचे शेअर्स देखील त्यापैकीच एक आहेत. पेनी स्टॉक असलेल्या या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा देऊन मालामाल केले आहे. BSE वर आज हे शेअर्स 16.5 रुपयांवर बंद झाले.

गेल्या जवळपास दीड महिन्यांपासून हे शेअर्स सतत 2 टक्क्यांच्या अप्पर सर्किटच्या आसपास ट्रेड करत आहे. 27 सप्टेंबर रोजी कंपनीने स्टॉक स्प्लिटच्या रेकॉर्ड डेट बाबत स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे. ग्रीनक्रेस्ट फायनान्शिअल सर्व्हिसेसने 12 ऑक्टोबर ही स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट ठरवली आहे. स्प्लिटनंतर, या स्टॉकची फेस व्हॅल्यू 10 रुपयांवरून 1 रुपयांवर येईल.

गेल्या एका वर्षात यामध्ये 231.53 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच 8 ऑगस्टपासून हे शेअर्स सातत्याने अप्पर सर्किटच्या पातळीला स्पर्श करत आहे. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 60.35 कोटी रुपये आहे. या शेअर्समध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांनी प्रचंड पैसा कमावला आहे.

ग्रीनक्रेस्ट ही कंपनी फायनान्शियल सर्व्हिसेस पुरवते. आधी या कंपनीचे नाव मॅरिगोल्ड ग्लास इंडस्ट्रीज लिमिटेड असे होते. मात्र मे 2013 मध्ये तिचे नाव बदलण्यात आले. ग्रीनक्रेस्ट बीएसई आणि कोलकाता स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे. कंपनीकडून आपला अतिरिक्त निधी स्टॉक आणि सिक्युरिटीजमध्ये गुंतवला जातो. BSE वर उपलब्ध शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी जवळपास 1.25 टक्के आहे. Penny Stock

ऑक्टोबर 2017 मध्ये Greencrest Financial Services च्या शेअर्सची किंमत 700 रुपये होती. या पातळीपासून, शेअर 8 रुपयांचा नीचांक बनवून 16.51 रुपयांवर ट्रेड करत आहे. Penny Stock

Smart News:-