2 हजार गुंतवा, 4 कोटी मिळवा; RBI च्या ‘या’ व्हायरल मेलनं इनबॉक्स फुल्ल!

केवळ 12500 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळवा 4 कोटी! रिझर्व्ह बँकेकडून(RBI) मिळणाऱ्या ईमेलने सर्वांचे इनबॉक्स फुल्ल होत आहे. तुम्ही कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नावे बनावट मेल व्हायरल होत आहे. केंद्रीय माध्यम संस्थेनं (पीआयबी) (PIB) ईमेल बनावट असल्याचं स्पष्ट केलं आहे.रिझर्व्ह बँके द्वारे वैयक्तिक माहिती ग्राहकांकडून मागण्याची तरतूद नाही. त्यामुळे तुम्हाला अशाप्रकारे वैयक्तिक माहितीची विचारणा केली जात असल्यास माहिती सार्वजनिक करू नका. अन्यथा तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं. रिझर्व्ह बँकेकडून वैयक्तिक माहितीसाठी विचारणा केली जात नाही. रिझर्व्ह बँकेत वैयक्तिक खाते (PERSONAL ACCOUNT) उघडले जात नाही. कोणत्याही प्रकारे पैशांची देवाणघेवाण केली जात नाही.
वापरा खात्रीशीर स्त्रोत:
रिझर्व्ह बँकेने(RBI) लोकांना सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे. रिझर्व्ह बँकेची एकमेव अधिकृत संकेतस्थळ आहे. त्यावर बँकेद्वारे अधिकृत माहिती प्रसारित केली जाते. त्यामुळे बँकांच्या उपक्रमाविषयी ग्राहकांनी नेहमी रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत स्त्रोतांचा वापर करायला हवा असे बँकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
अफवांपासून सावध राहा
पीआयबीनं फॅक्ट चेकच्या माध्यमातून दाव्याची सत्यता पडताळली आहे. व्हायरल मेसेज होणारा पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे. रिझर्व्ह बँकेने(RBI) याबाबतची कोणतीही योजना आखलेली नाही. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अशा प्रकारच्या अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मेसेजपासून सावध राहा
पीआयबी फॅक्ट चेकनंतर हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले जात आहे. लिंकवर क्लिक करण्याद्वारे कुणीही खासगी बँकिंग संबंधित माहिती सार्वजनिक करू नये. बँक खात्याचे तपशीलांची माहिती दिल्यास मोठ्या आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते.
अभिनेत्री अमृता सुभाषला स्वतःच्या बर्थडेपेक्षा नवऱ्यानं काढलेल्या फोटोचं जास्त कौतुक;
“सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच काढता पाय घेतला”; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
आता अमेरिका मंदीच्या उंबरठ्यावर, संकट टाळणे कठीण, गोल्डमॅनच्या तज्ज्ञांचा दावा
‘हे’ पान खाल्ल्यानं होतात आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या