शेअर बाजारात पडझड ; गुंतवणूकदारांची निराशा

कोरोना संकटाच्या भीतीमुळे भारतीय शेअर बाजारात पडझड सुरू असल्याचे दिसून येत आहे. शेअर(landmark cars)बाजारात सुरू असलेल्या घसरणीमुळे अस्थिरतेचे वातावरण आहे. तर, दुसरीकडे आज कंपन्यांची शेअर बाजारात लिस्टिंग झाली. Landmark Cars आणि Abans Holdings या दोन कंपन्या बाजारात लिस्ट झाल्या. मात्र, लिस्टिंगनंतर या आयपीओत शेअर्स मिळालेल्या गुंतवणूकदारांच्या हाती निराशा लागली.

Landmark Cars कंपनीचा(landmark cars) शेअर हा डिस्काउंट दरावर बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध झाला. लँडमार्क कार्सचा शेअर बीएसईवर 471.30 रुपये आणि एनएसईवर 471 रुपयांवर सूचीबद्ध झाला. या दोन्ही निर्देशांकावर अनुक्रमे 6.86 टक्के आणि 6.92 टक्क्यांनी सूचीबद्ध झाला. लँडमार्क कार्स कंपनीने आयपीओमध्ये प्रति शेअर 506 रुपये प्रति शेअर इतका दर निश्चित केला होता. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लँडमार्क कार्सचा शेअर दर 8 टक्क्यांच्या घसरणीसह 464.35 रुपयांवर व्यवहार करत होता.

Landmark Cars च्या आयपीओला गुंतवणुकदारांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 8.71 पटीने, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 1.32 पटीने आणि किरकोळ गुंतवणुकदारांचा कोटा 0.59 पटीने सब्सक्राइब झाला होता. कंपनीने आयपीओत अधिक व्हॅल्यूएशन केल्यामुळे आयपीओला कमी प्रतिसाद मिळाला असल्याची चर्चा आहे.

Abans Holdings कडूनही निराशा
Abans Holdings कंपनी आज बाजारात सूचीबद्ध झाली. Abans Holdings या कंपनीचा शेअर एनएसईवर 270 रुपयांवर आणि बीएसईवर 273 रुपयांवर सूचीबद्ध झाला. Abans Holdings ने आपल्या आयपीओत प्रति शेअर 270 रुपये इतका शेअर दर निश्चित केला होता.

Abans Holdings च्या शेअर दरातनंतर मोठी घसरण दिसून आली. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास 14.76 टक्क्यांच्या घसरणीसह 230.20 रुपयांवर व्यवहार करत होता. Abans Holdings ही कंपनी गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहे.

शेअर बाजारात घसरण
जागतिक शेअर बाजारात झालेली  पडझड आणि कोरोना महासाथीची भीती याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. अमेरिकन शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. तर, आशियाई शेअर बाजारातही नकारात्मक संकेत आहेत. त्याच्या परिणामी आज भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण दिसून येत आहे. निफ्टी निर्देशांक 18000 अंकांखाली व्यवहार करत आहे.

हेही वाचा :