गुंतवणुकीची मोठी संधी; ९७ आयपीओ येणार..!

२०२१-२२ मध्ये जोरदार कामगिरीनंतर (ipo news) आयपीओ बाजारात येणाऱ्या आर्थिक वर्षातही मोठी वाढ पाहायला मिळणार आहे. पुढील आर्थिक वर्षात तब्बल ९७ कंपन्या आयपीओच्या माध्यमातून २.२५ लाख कोटी रुपये बाजारातून गोळा करण्याच्या तयारीत आहेत.
आतापर्यंत एलआयसीसह इतर ४३ कंपन्यांना बाजार नियामक सेबीने आयपीओसाठी मंजुरी दिली असून, आणखी ४३ कंपन्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या ५४ कंपन्या एकूण १.४० लाख कोटी रुपये गोळा करणार असून, ८१ हजार कोटी रुपयांसाठीचे ४३ आयपीओंचे अर्ज सेबीकडे आले आहेत.

त्यांनाही सेबी लवकरच मंजुरी देण्याची शक्यता आहे. कंपन्या वाढती महागाई, व्याजदर वाढण्याचा परिणाम आणि रशिया-युक्रेन युद्ध संकटामुळे शेअर बाजारात आलेला चढउतार शांत होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. परिस्थिती निवळल्यानंतर आयपीओ सादर करण्यात येणार आहेत. आयपीओ सादर केल्याने कंपन्यांना आपले उत्पादन विस्तारण्याची मोठी संधी मिळते.(ipo news)

कंपनी आयपीओ आकार (कोटी रुपयांत)३,६००कंपनी आयपीओ आकार (कोटी रुपयांत)
एलआयसी ६५,०००
ओयो रुम्स ८,४३०
डेलिव्हरी ७,४६०
एपीआय होल्डिंग्स ६,२५०
भारत एफआयएच ५,००३
एमक्यूअर फार्मा ४,०००
गो एअरलाइन्स ३,६००
फाइव्ह स्टार फायनान्स २,७५२
जेमिनी इडिबल्स २,५००
पारादीप फॉस्फेट्स २,२०

हेही वाचा :


रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *