3 वर्षांच्या उच्च्चांकाजवळ, हे शेअर्स तुमच्याकडे आहेत का ?

ITC चे शेअर्स (shares of itc) सध्या फुल फॉर्ममध्ये आहेत. मार्च 2022 चे तिमाही निकाल चांगले आलेत आणि यातच त्याचे शेअर्स 3 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचलेत. ITC च्या शेअर्सने आज तेजीने सुरुवात केली आणि लगेचच NSE वर 282.35 रुपयांवर पोहोचले. अशातच ITC चे शेअर्स शॉर्ट टर्ममध्ये 320 रुपयांची पातळी गाठू शकतात असा विश्वास शेअर बाजार तज्ज्ञांना वाटत आहे.

सध्या हा स्टॉक पूर्ण ट्रेंडमध्ये आहे आणि येत्या ट्रेडिंग सत्रांमध्ये शॉर्ट टर्ममध्ये वाढ होऊ शकते असे एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजचे मुदित गोयल म्हणाले. अलीकडेच त्यांनी 255 रुपयांवर क्लोजिंग आधारावर ब्रेकआउट दिला आहे. त्यामुळे, ज्यांच्याकडे हा स्टॉक आहे त्यांनी 320 रुपयांच्या शॉर्ट टर्म टारगेटसाठी हे शेअर्स ठेवावे असा सल्ला त्यांनी दिला.

आयटीसीने (shares of itc) दुसऱ्या तिमाहीत चौथ्या तिमाहीत सिगारेट वॉल्यूममध्ये सुमारे 9 टक्क्यांच्या वाढीसह चांगली कामगिरी केल्याचे आयसीआयसीआय सिक्युरिटीजने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे. येत्या काळात हा शेअर आणखी वाढेल असा विश्वासही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
कंपनीच्या FMCG व्यवसायाचा वाढीचा दर सुमारे 12 टक्के असू शकतो. कंपनीचा हॉटेल आणि कृषी व्यवसायही मजबूत राहण्याची अपेक्षा आहे.

ITC चे शेअर्स मागील 4 ट्रेडिंग सत्रांमध्ये तेजीच्या मूडमध्ये आहे. गेल्या 4 ट्रेडिंग सत्रांमध्ये हा शेअर 254 रुपयांवरून 281 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत त्यात 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 24 फेब्रुवारी 2022 पासून आतापर्यंत या शेअरने 25 टक्के परतावा दिला आहे.

हेही वाचा :


राज यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *