या स्टाॅक ने केली भागधारकांची संपत्ती दुप्पट..!

केईआय इंडस्ट्रीज लिमिटेड (kei industries share price) ही एस अँड पी बीएसई ५०० कंपन्यांमधील एक कंपनी आहे. कंपनीने गेल्या एका वर्षात त्यांच्या भागधारकांसाठी मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण केली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरच्या किंमतीत १२७% ने वाढ झाली आहे. बीएसईवर KEI Industries Ltd शेअरचा गेल्या ५२ आठवड्यांचा उच्चांक आणि नीचांक अनुक्रमे रु. १,२७६.९५ आणि रु. ४७५ आहे.

कंपनी इलेक्ट्रिकल वायर आणि केबलची उत्पादक आहे. ऊर्जा, तेल आणि वायू, पेट्रोकेमिकल, स्टील यांसारख्या विविध क्षेत्रांची गरज पूर्ण करते. कंपनी प्रामुख्याने केबल, स्टेनलेस स्टील वायर आणि ईपीसी प्रकल्प या तीन विभागांमध्ये कार्यरत आहे. याशिवाय १५,००० भागीदारांसह कंपनीचे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये मजबूत स्थान आहे.(kei industries share price)

चालू आर्थिक वर्षाच्या तिस-या तिमाहीत कंपनीचा निव्वळ महसूल वार्षिक ३५.६४% ने वाढून रु. १,५६४ कोटी झाला. यापैकी जवळपास ९०% महसूल केबल व्यवसायातील आहे. तर उर्वरित १०% स्टेनलेस स्टील वायर आणि ईपीसी प्रकल्प व्यवसायातील आहे. त्याचप्रमाणे कंपनीचा निव्वळ नफा ३२.९६% ने वाढून १०१.२५ कोटी रुपये झाला आहे.

मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात कंपनीचे शेअर रु. १,२६७.०५ वर व्यवहार करत होते. ते आदल्या दिवशीच्या रु. १,१९७.९० या बंद भावापेक्षा ५.७७% ने वाढले होते.

हेही वाचा :


Google Pay च्या नवीन फीचरची धमाल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *