गुंतवणूकदारांसाठी कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडाचे नव अभियान

कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडाने नवीन गुंतवणूकदार (investors)शिक्षण आणि जनजागृती अभियान ‘गो ऑटोमॅटीक विथ बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड्स’ची नुकताच घोषणा केली. ज्या गुंतवणुकदारांना बाजाराच्या उतार-चढावाची चिंता न करता स्वत:च्या कष्टाने कमावलेल्या पैशाची गुंतवणूक करण्यासाठी योग्य संधीची प्रतीक्षा आहे त्यांच्याकरिता शिक्षण उपलब्ध करून देणारा हा एक उपक्रम आहे.
बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड्स (बीएएफ) बाजार स्थितिनुसार इक्विटी आणि डेट स्वयंचलित पद्धतीने समायोजित करतात. ज्यामुळे गुंतवणुकदाराला(investors)त्यांच्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलियोचे व्यवस्थापन वैयक्तिकरित्या करण्याचे स्वातंत्र्य मिळते.
कोटक महिंद्रा असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष आणि एमडी नीलेश शहा म्हणाले की, “जर तुम्ही बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणारे, किंवा बाजारातील संधीचा शोध घेणारे अथवा दीर्घकालीन गुंतवणूक करणारे किंवा योग्य संधीची वाट पाहणारे तरूण गुंतवणूकदार असाल तर बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड्स हा सर्व प्रकारच्या गुंतवणुकदारांना मदत करणारा पर्याय ठरतो.
बाजार खाली असताना हा फंड अधिक इक्विटी जमा करतो आणि बाजार वर गेल्यावर मर्यादित इक्विटी ठेवतो. जेणेकरून तोटा होण्यापासून बचाव होईल. सुरुवातीला, डेट आणि इक्विटी यामधील असेट अलोकेशनची जबाबदारी गुंतवणूकदार फंड मॅनेजरला देत. आम्ही म्युच्युअल फंड स्कीम प्रकारातील बीएएफबद्दल अभियानाची सुरुवात करून एखादी व्यक्ति स्वयंचलित पद्धतीने आपली गुंतवणूक रक्कम वापरुन म्युच्युअल फंडच्या साह्याने दीर्घकालीन संपत्ती निर्मितीची सुरुवात करू शकते.
हेही वाचा :