‘एलआयसी’चा आयपीओ ; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

‘भारतीय आयुर्विमा महामंडळा’ची (lic ipo news) प्राथमिक भागविक्री केव्हा सुरू होणार, याविषयी सर्वच प्रकारच्या गुंतवणूकदारांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. १३ फेब्रुवारीला भांडवल बाजार नियंत्रक सेबीकडे या आयपीओसाठी अर्ज सादर केल्यानंतर एलआयसीला पुढील महिन्यातील पहिल्या पंधरवड्यापर्यंत हा आयपीओ बाजारात आणावा लागणार आहे. याविषयीचा अंतिम निर्णय याच आठवड्यात घेतला जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे.

एलआयसीच्या (lic ipo news) आयपीओद्वारे केंद्र सरकार एलआयसीतील पाच टक्के हिस्सा ३१.६० कोटी समभागांच्या रूपाने विकणार आहे. त्यासाठी हा आयपीओ मार्च महिन्यात येणार होता. परंतु रशिया – युक्रेन युद्धामुळे हा आयपीओ लांबणीनर टाकला गेला. आता सरकारपाशी १२ मेपर्यंतचा वेळ आहे. ही तारीख उलटून गेल्यास मात्र, आयपीओची प्रक्रिया सुरुवातीपासून करावी लागणार आहे.

आयपीओसाठी प्राथमिक तयारीचा भाग म्हणून एलआयसीचे मूल्यांकन मिलमन अॅडव्हायझर्स या संस्थेकडून ३० सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आलं. त्यानुसार एलआयसीचे मूल्य ५.४० लाख कोटी रुपये ठरवले गेले आहे. परंतु प्रत्यक्षात हे मूल्य दुप्पच ते तिप्पट अधिक असावे असा अंदाज आहे. आता हा आयपीओ १२ मेपर्यंत बाजारात आणला जाणार असेल, तर सेबीकडे एलआयसीला पुढच्या आठवड्यात रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस भरावे लागेल, असेही त्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

दरम्यान, एलआयसीकडून नुकताच आर्थिक वर्ष २०२१-२२ ची आकेडवारी जाहीर करण्यात आली होती. ‘एलआयसी’ने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये २ कोटी १७ लाख विमा पॉलिसींची विक्री केली. २०२०-२१ च्या तुलनेत विक्रीत गेल्या वर्षात विमा विक्रीत ३.५४ टक्के वाढ झाली. यामुळे एलआयसीचा विमा बाजारातील हिस्सा ७४.६० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात २ कोटी १० लाख विमा पाॅलिसींची विक्री झाली होती. त्यावेळी एलआयसीचा बाजारात ७४.५१ टक्के हिस्सा होता.

हेही वाचा :


पुरुषांनाच का पडते टक्‍कल? जाणून घ्या कारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *