भक्कम फंडामेंटल असणारा हा स्वस्त स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओत आहे का ?

शेअर मार्केटमध्ये सध्या लिस्टेड कंपन्या मार्च तिमाहीचे निकाल सादर करत आहेत. तिमाही निकालांमुळे शेअर्समध्येही चांगली तेजी दिसून येत आहे. त्यामुळे तुम्हाला आता शेअर बाजारात पैसे गुंतवायचे असतील तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी तुमच्यासाठी एका शेअरची निवड केली आहे.(market expert)
बाजार तज्ज्ञ (market expert) संदीप जैन यांनी गॉडफ्रे फिलिप्स (Godfrey Phillips) शेअर्सच्या खरेदीचा सल्ला आहे. त्यांच्या मते ही उत्तम दर्जाची कंपनी आहे. या कंपनीने एनसीआरमध्ये 24*7 रिटेल चेन सुरु केल्या आहेत. या स्टॉकचे व्हॅल्युएशन खूप स्वस्त आहे.
गॉडफ्रे फिलिप्स (Godfrey Phillips)
सीएमपी (CMP) – 1224.40 रुपये
टारगेट (Target) – 1350 रुपये
कंपनीचे फंडामेंटल्स ?
कंपनीचे फंडामेंटल्स अतिशय भक्कम असल्याचे जैन यांनी सांगितले. ही कंपनी सुमारे 2 टक्के डिविडेंड यील्ड देते. प्रमोटर्सचे शेअरहोल्डिंग सुमारे 73 टक्के आहे. कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 23-24 टक्के आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा
हेही वाचा :