सोन्याच्या किंमतीत तब्बल 1500 रुपयांची मोठी घसरण!

सध्याच्या लग्नसराईच्या दिवसांमध्ये सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. वैश्विक बाजारात सोने – चांदीच्या किंमतींमध्ये घसरणीचा परिणाम भारतीय बाजारांमध्येही दिसून येत आहे. सोन्याची किंमत आज 1500 रुपये प्रति तोळे इतकी घसरली आहे. सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे सोने गेल्या 3 महिन्याच्या निच्चांकी स्तरावर घसरले आहे.(mcx gold price)
सोने चांदीचे भाव
मल्टीकमोडिटी एक्स्चेंज (mcx gold price)वर आज सकाळी 24 कॅरेट सोन्याचे दर 50158 रुपये प्रति तोळे इतके झाले होते. सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत काहीशी वाढ झाली. त्यानंतर अचानक सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण होत गेली. रंतू चांदीच्या दरांमध्ये घसरण नोंदवण्यात आली. सकाळी चांदीच दर 58920 रुपये प्रति किलो इतके होते.
मुंबईतील आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर 51,490 रुपये प्रति तोळे इतके होते. कालपेक्षा मुंबईतील आजच्या सोन्याच्या दरांमध्ये 1000 रुपयांनी घसरण नोंदवण्यात आली. तर चांदीचे दर 60,800 रुपये प्रति किलो इतके होते.
हेही वाचा :