या तीन बँंका देत आहेत जादा व्याज..!

fixed deposit

जर तुमच्याकडे काही अतिरिक्त पैसे असतील, जे तुम्ही साठवले आहेत, तर तुम्ही त्याचे काय कराल? किंवा समजा आज तुमच्या खात्यात काही पैसे आले, जे तुम्हाला महिन्याभरानंतर किंवा २-३ महिन्यांनी हवे असतील, तर तुम्ही त्याचे काय कराल? हा पैसा शेअर बाजारात गुंतवणे म्हणजे मोठी जोखीम घेणे होय. तुमचे पैसे वाढण्याऐवजी कमी होऊ शकतात. अशा परिस्थितीत, गुंतवणुकीचे सर्वात सुरक्षित आणि हमी असलेले परताव्याचा पर्याय म्हणजे एफडी (Fixed Deposit). काहीजण अल्प कालावधीसाठीही पैशाची एफडी करतात, ज्यावर त्यांना ५ ते ७ टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो.

जर बचत खात्यात पैसे ठेवल्यावर एखादी बँक तुम्हाला एफडी (fixed deposit) सारखी रिटर्न देऊ लागली, तर कसे वाटेल? ना तुम्हाला एफडी घ्यावी लागणार आहे, ना अचानक पैशांची गरज भासल्यास ती मोडावी लागणार आहे. अशाच तीन बँकांबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

१. डीसीबी (DCB) बँक
सध्या डीसीबी (DCB) बँक ही एकमेव खाजगी बँक आहे, जी बचत खात्यावर सर्वाधिक व्याज देत आहे. ही बँक ५० लाख ते २ कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेवर ६.७५ टक्के दराने व्याज देत आहे. जर तुमच्याकडे पैसे कमी असतील, तर तुम्हाला कमी व्याज मिळेल. १ लाख रुपयांपर्यंत २.५ टक्के, २ लाखांपर्यंत ४.५ टक्के, २-१० लाख रुपयांपर्यंत ५ टक्के, १०-२५ लाखांपर्यंत ६.२५ आणि २५-५० लाख रुपयांपर्यंत ६.५ टक्के व्याज मिळत आहे.

fixed deposit

२. आरबीएल (RBL) बँक
बचत खात्यावर भरमसाठ व्याज देणाऱ्या बँकांच्या यादीत आरबीएल (RBL) बँक ही दुसऱ्या क्रमांकावर बँक आहे. येथे तुम्हाला १० लाख ते ५ कोटी रुपयांच्या ठेवीवर जास्तीत जास्त ६.२५ टक्के व्याज मिळू शकते. आरबीएल बँकेत १ लाख रुपयांपर्यंत तुम्हाला ४.२५ टक्के आणि १-१० लाख रुपयांपर्यंत तुम्हाला ५.५ टक्के मिळतील. तुम्हाला बचत खात्यात जास्त पैसे ठेवायचे असतील, तर आरबीएल बँक हा एक चांगला पर्याय आहे.

३. बंधन बँक
तुम्ही बंधन बँकेच्या बचत खात्यातही पैसे ठेवू शकता. येथे तुम्हाला कमाल ६ टक्के व्याज मिळू शकते. जर तुमच्या खात्यात १० लाख ते २ कोटी रुपये असतील तर तुम्हाला ६ टक्के व्याजदर मिळेल. याशिवाय तुम्हाला १ लाख रुपयांपर्यंत ३ टक्के आणि १-१० लाख रुपयांपर्यंत ५ टक्के व्याज मिळेल.

हेही वाचा :


बॉल एवढा वेगात टाकला की स्टंम्पचे 2 तुकडेच झाले, पाहा व्हिडीओ!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *