सोने दरात घसरण; जाणुन घ्या आजचा भाव..!

आज बुधवारी सोने-चांदी दरात घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (multi commodity exchange) सोनं 41 रुपये स्वस्त झालं आहे. या घसरणीसह सोनं आज सकाळी 51330.00 रुपयांवर ट्रेड (Gold Price Today) करत आहे. चांदीचा भावही (Silver Price Today) आज कमी झाला आहे. चांदीचा दर 222 रुपयांनी कमी झाला असून चांदी 65976.00 रुपयांवर ट्रेड करत आहे.
22 कॅरेट सोन्याचा भाव 48290 रुपयांवर ट्रेड करत आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52680 रुपये आहे. 20 कॅरेट सोन्याची किंमत 43900 रुपये आहे. तर 18 कॅरेटचा भाव 39510 रुपये आहे. सराफा बाजारात एक किलोग्रॅम चांदीचा भाव 67880 रुपयांवर ट्रेड करत आहे.
आयएसओकडून (Indian Standard Organization) सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी हॉलमार्क दिले जातात. त्यानुसार 24 कॅरेट सोन्यावर 999 लिहिलेलं असतं. तर 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिलेलं असतं. अधिकतर सोन्याची विक्री 22 कॅरेटमध्ये होते.(multi commodity exchange)
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यात काय आहे फरक?
22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत फरक असतो. प्रमुख फरक सोन्याच्या शुद्धतेचा असतो. 24 कॅरेट सोनं 99.9 टक्के शुद्ध असतं. तर 22 कॅरेट सोनं 91 टक्के शुद्ध असतं. यात 9 टक्के इतर धातू मिक्स असतात. तर 24 कॅरेट सोन्यात कोणतीही भेसळ नसते. परंतु 99.9 टक्के इतक्या शुद्ध असलेल्या 24 कॅरेट सोन्यापासून कोणतेही दागिने बनवता येत नाहीत.
हेही वाचा :