मल्टीबॅगर केमिकल स्टॉकचा एका वर्षात 110% परतावा!

केमिकल सेक्टरमधील शारदा क्रॉपकेम (sharda cropchem) हा या वर्षीचा मल्टीबॅगर स्टॉकमध्ये समाविष्ट आहे. गेल्या 5 व्यापार सत्रांमध्ये या शेअरने 10.95 टक्क्यांनी वाढ केली आहे आणि या कालावधीत बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्सला मागे टाकले आहे. गेल्या 5 दिवसात सेन्सेक्समध्ये फक्त 0.35 टक्के वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत बीएसई सेन्सेक्स 8.92 टक्क्यांनी घसरला असूनही या कालावधीत या शेअरने 110.84 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
2022 मध्ये आतापर्यंत या स्टॉकने 98.43 टक्के वाढ केली आहे, तर एका वर्षात या स्टॉकने 105.53 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. त्याच वेळी, सेन्सेक्सने एका वर्षाच्या कालावधीत केवळ 8.22 टक्के परतावा दिला आहे.(sharda cropchem)
आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीसाठी, ब्रोकरेज फर्म आनंदराठी या स्टॉकबाबत बुलिश आहे आणि त्यांनी या स्टॉकला खरेदी रेटिंग (Buy Rating) दिले आहे आणि त्यासाठी प्रति शेअर 835 रुपयांचे टारगेट दिले आहे. सध्या हा शेअर 706 रुपयांच्या आसपास दिसत आहे.
31 मार्च 2022 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत, कंपनीची कंसोलिडेटड कमाई वार्षिक 31.8 टक्क्यांनी वाढून 1,434.5 कोटी झाली आहे, जी मागील वर्षीच्या याच तिमाहीत 1088.13 कोटी होती. या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 177 कोटी होता, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 133.93 कोटींवरून 32.2 टक्क्यांनी वाढला आहे.
कंपनीचा ग्रोथ आउटलुक स्ट्राँग दिसत आहे. त्याचा बॅलेन्सशीट, फ्री कॅश फ्लो आणि तगडा रिटर्न रेश्यो गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून एक चांगला पर्याय असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
हेही वाचा :