२५ पैशांच्या या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं

Multibagger Penny Stock: जर तुम्ही १० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्टॉरच्या शोधात असाल, तर आज आम्ही तुम्हाला एका अशा शेअर(multibagger) बद्दल माहिती देणार आहोत, ज्यानं आपल्या गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं. २५ पैशांचा हा शेअर आता ६ रुपयांच्या पुढे गेला आहे.
२५ पैशांच्या या पेनी शेअरनं(multibagger) गुंतवणूकदारांना २४४० टक्क्यांचा नफा मिळवून दिला असून तो आता ६.३५ रुपयांवर पोहोचला आहे. केवळ एका वर्षात या शेअरनं कमाल केली आहे. वर्षभरातच या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.
छप्परफाड रिटर्न देणाऱ्या या शेअरचं नाव राज रेयॉन इंडस्ट्रीज (Raj Rayon Industries Ltd) असं आहे. कंपनीचे शेअर मंगळवारी एनएसईवर ६.३५ रुपयांवर पोहोचले होते. तर दुसरीकडे बीएसईवर हा शेअर १०.२६ रुपयांवर पोहोचला आहे.
१७ मे २०२१ रोजी हा शेअर २५ पैशांवर होता. त्यानंतर १६ मे रोजी हा शेअर ६.३५ रुपये प्रति शेअरवर पोहोचला. केवळ ४० ट्रेडिंग सेशन्समध्ये या शेअरनं ५९२ टक्क्यांचं जबरदस्त रिटर्न दिलं आहे.
महिन्याभरात हा शेअर २.९० रुपयांवरून वाढून ६.३५ रुपयांवर गेला. तर गेल्याएका महिन्यात या शेअनं ११८.९७ टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सेशन्समध्ये या शेअरमध्ये १९.८१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
राज रेयॉनच्या शेअर हिस्ट्रीनुसार जर एखाद्या गुंतवणूकदारानं ६ महिन्यांपूर्वी यात १ लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याचं मूल्य ४.७० लाख रुपये झाले असते. गेल्या एका वर्षात या शेअरनं २४४० टक्के रिटर्न दिला आहे.
वर्षभरापूर्वी या शेअरची किंमत केवळ २५ पैसे होते. याचाच अर्थ गेल्या एका वर्षात या शेअरनं एक लाख रुपयांचे २५.४० लाख रुपये केले आहेत. ही कंपनी वस्त्रोद्योग क्षेत्रात सक्रिय आहे. १९९३ मध्ये स्थापन करण्यात आलेली ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे.
हेही वाचा :