खाद्यतेलाच्या दरात विक्रमी ‘वाढ’

इंधनदरवाढीसह सर्वच खाद्यान्नाच्या दरात सतत वाढ होत आहे. आधीच महागाईचा(inflation) सामना करणाऱ्या ग्राहकांना खाद्यतेलाच्या दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालताच दोन दिवसात खाद्य तेलाच्या दरात प्रति किलो १५ ते १६ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे २५०० रुपयांचा असलेला सोयाबीन तेलाचा (१५ किलो) डब्बा २७०० ते २७५० रुपयांवर पोहचला आहे. शेंगदाण्याच्या तेलात दरात किंचित वाढ झाली असून २६५० रुपयावरुन २७५० रुपये (१५ किलो डब्बा) झाले आहे. त्यामुळे सोयाबीन आणि शेंगदाणे तेलाचे दर एका पातळीवर आले आहे.
इंडोनेशिया हा जगातील सर्वांत मोठा पाम तेल उत्पादक देश आहे. तर मलेशिया दुसऱ्या क्रमांकावर येते. इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पामतेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाने भारतातील पामतेलाच्या आयातीवर वाईट परिणाम होणार आहे. भारताला आता मलेशियावर अवलंबित्व वाढवावे लागणार आहे. निर्यातीवर निर्बंध आल्याने त्याचा थेट फटका महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्यांना बसणार आहे.
इंडोनेशियाच्या या निर्णयामुळे जागतिक अन्नधान्य महागाईत(inflation) वाढ होण्याची शक्यता आहे. देशात मोहरीच्या तेलाची किंमत जास्त आहे. दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल तेलाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे सूर्यफूल तेल खूप महाग झाले आहे. आता इंडोनेशियाची पामतेल निर्यात थांबविल्यानंतर महागाई आणखी वाढणार आहे. इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर बंदी घालताच भाव वाढ सुरु झाली आहे. राइस ब्रान, सोयाबीन, सूर्यफूलासह शेंगदाणे तेल वाढल्याने तळण महागले आहे.
डाळी, गहू स्थिर
उन्हाळ्याचा कडाका वाढला असल्याने ग्राहकांकडून साठवणीसाठी धान्याच्या खरेदीचा वेग वाढला आहे. मात्र, आवक चांगली असून उत्पादनातही वाढ झाल्याने तूरडाळ, हरभरा डाळ, मुग डाळीचे भाव स्थिरावलेले आहे. युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे देशांतर्गत गव्हाची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे यंदा भारतातून १ कोटी १० लाख टन गव्हाची निर्यात होण्याची शक्यता आहे. परिणामी, गव्हाचे भाव वाढलेले आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून गव्हाचे दर वाढलेल्या स्थितीत स्थिरावलेले आहेत.
भारत नऊ दशलक्ष टन पामतेल आयात करतो.
७० टक्के पामतेल इंडोनेशियातून येते.
३० टक्के तेल मलेशियामधून येते.
२०२०-२१ मध्ये ८३.१ लाख टन पामतेल आयात केले.
हेही वाचा: