पेमेंटसाठी GPay, Paytm App वापरताय? मग “सावध”

प्रत्येकाजवळ आता UPI App किंवा नेट बँकिंग (Net banking) आहे. छोट्या ते मोठं बिल देण्यासाठी सर्व साधारणपणे UPI अॅप, नेट बँकिंग वापरतो. किराणा दुकान (Grocery store) असो, भाजीपाल्याची गाडी असो किंवा शॉपिंग मॉल (Shopping mall), आजकाल ऑनलाइन पेमेंटची (Online payment) सुविधा सर्वत्र उपलब्ध आहे.
एवढेच नाही तर या पद्धतींद्वारे आपण पैसे ट्रान्सफर (Money transfer) करू शकतो किंवा मिळवू शकतो. ऑनलाईन पेमेंटमुळे आर्थिक व्यवहार करणे खूप सोपे झाले आहे. पण डिजिटल व्यवहार (net banking) करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे देखील महत्वाचे आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महत्वाचे म्हणजे, फसवणूक करणारे तुमचे पैसे चोरण्याचे नव-नवीन मार्ग शोधत असतात. यामुळे काही गोष्टींकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. असे केल्यास होणारी फसवणूक टाळता येईल. मग कोणत्या मार्गाने तुमची ऑनलाईन व्यवहार सुरक्षित ठेवाल.
UPI अॅप अपडेट ठेवा:
सायबर गुन्हेगारांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही तुमचे UPI अॅप वेळोवेळी अपडेट करत राहा. सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी, कंपन्या प्रत्येक अपडेटसह नवीन वैशिष्ट्ये प्रदान करतात. अशा परिस्थितीत UPI अॅप नेहमी अपडेट ठेवा.
पिन विषयी घ्या काळजी :
कोणत्याही UPI अॅपमध्ये, पैसे मिळवण्यासाठी युजरला त्याचा/तिचा पिन प्रविष्ट करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे, पैसे पाठवताना कोणी तुम्हाला तुमचा पिन टाकण्यास सांगत असल्यास सावधगिरी बाळगा.आजकाल लोकांना Mail आणि WhatsApp वर विशेषत: सणासुदीच्या काळात आकर्षक ऑफर्स मिळतात. अशा लिंक्स तुम्हाला ‘गिफ्ट’ किंवा ‘कॅशबॅक’ प्राप्त करण्यासाठी तुमचा पिन आणि इतर तपशील प्रविष्ट करण्यास सांगतात. त्यामुळे अशा लिंक्सची काळजी घ्या आणि त्यावर क्लिक करू नका.
फ्रॉड कॉलपासून सावध : सायबर गुन्हेगार लोकांना फक्त लिंक पाठवून पैसे चोरण्याचा प्रयत्न करत नाहीत तर, ते युजर्सना थेट कॉल करून त्यांचा पासवर्ड, पिन इत्यादी विचारतात. बँका कॉलवर असे डिटेल्स विचारत नाहीत. त्यामुळे अशा कोणत्याही कॉलला तुम्ही बळी पडू नका.