या; कारणामुळे शेअर बाजारात पुन्हा मंदी!

आज सोमवारी शेअर बाजार खुला होताच त्यात घसरण दिसून आली. सकाळी बाजार सुरु होताच बीएसई सेन्सेक्स (Sensex) सुमारे ६३१ अंकांनी घसरला. निफ्टीही (nifty news) खाली आला. कमकुवत जागतिक संकेतामुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.
सकाळी बाजारात खुला होताच सेन्सेक्स ६३१ अंकांनी घसरून ५६,४२९ वर तर निफ्टी १७८ अंकांनी घसरून १६,९२४ वर आला. टॉप लुजर्समध्ये बजाज, इन्फोसिस, अशियन पेंट्स, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक यांचा समावेश होता.(nifty news)
NSE वर उपलब्ध तात्पुरत्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) २९ एप्रिल रोजी ३,६४८.३० कोटी रुपयांचे शेअर्स विकले. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) ३,४९० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
हेही वाचा :