‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल!

आर्थिक वर्ष 2021-22 31 मार्चला संपले आहे. नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये असे अनेक शेअर होते ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल बनवले. गेल्या आर्थिक वर्षातील शेवटच्या काही महिन्यांमध्ये रशिया- युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारावर (Share Market) दबाव पाहायला मिळाला. शेवटचे काही महिने सोडले तर गेल्या वर्षी शेअर बाजारामधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला. बीएसई सेंसेक्स (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टीमध्ये (NSE Nifty) चांगली तेजी पहायला मिळाली.

गेल्या आर्थिक वर्षामध्ये बीएसई लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ होऊन ती 263.91 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये जवळपास 60 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 2011 साली शेअर मार्केटची एकूण कॅप 204.31 लाख कोटी इतकी होती. गेल्या वर्षी अशा अनेक कंपन्या होत्या की त्यांच्या शेअर्सने चांगला परतावा देऊन गुंतवणूकदारांना मालामाल बनवले. अशीच एक केमिकल क्षेत्रातील कंपनी आहे, ती म्हणजे एसआरफ लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. वर्षभरात गुंतवणूकदारांना दुप्पट पैसा मिळाला.(nse nifty)

एका वर्षात दुप्पट परतावा
एसआरफ लिमिटेड कंपनी ही प्रामुख्याने विविध प्रकारची रसायने, पॅकेजिंग आणि टेक्सटाइल्स क्षेत्राशी संबंधित उत्पादने तयार करते. या कंपनीने गेल्या वर्षीच नव्हे तर अनेक वर्षांपासून गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या वर्षभराचा आढावा घ्यायचा झाल्यास वर्षभरापूर्वी या कंपनीच्या स्टॉकची किंमत 1,148.65 रुपये एवढी होती. 31 मार्च 2022 त्याच स्टॉकची किंमत 2,713.45 रुपये एवढी झाली आहे. याचाच अर्थ या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास दुप्पट परतावा दिला आहे.

शेअर बाजाराची वाटचाल
गेल्या वर्षभरात शेअर बाजाराची वाटचाल कशी राहिली याचा आढावा घ्यायचे ठरल्यास मागील वर्ष गुंतवणूकदारांसाठी चांगले राहिले असे म्हणण्यास हरकत नाही. गेल्या वर्षभरात शेअर बाजाराचा सेंसेक्स 18.53 टक्क्यांनी वाढला. तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप अनुक्रमे 19.11 व 19.11 टक्क्यांनी वाढली. बीएसईच्या 566 शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. मात्र या सर्वांमध्ये Cosmo Ferrites या कंपनीने बाजी मारली आहे. ही कंपनी गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा देणारी कंपनी ठरली आहे.

हेही वाचा :


पाडव्याच्या दिवशी सांगलीला मिळाली आनंदाची बातमी..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *