मंगळवारी ‘या’ स्वस्त स्टॉककडे लक्ष द्या..!

cheap stocks to buy

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेने विलीनीकरणासाठी संचालक मंडळाची मान्यता जाहीर केल्यानंतर सेन्सेक्सने ६० हजारांचा टप्पा ओलांडला तर निफ्टीने १८००० चा स्तर गाठला. क्षेत्रीय निर्देशांकांच्या बाबतीत सांगायचे झाले तर बँक निफ्टी १,४५० अंकांनी झेपावला. ४ एप्रिल २०२२ च्या वायदापूर्तीसाठी MCX गोल्ड फ्युचर ०.२३% ने घसरून ५१,२२७ रुपयांवर आले. भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकी डॉलरचे मूल्य ०.६२% ने खाली येत ७५.५२ पर्यंत घसरले. जून २०२२ च्या व्यवहार पूर्तीकरिता कच्च्या तेलाची किंमत ७१ सेंटने घसरून १०३.७० डॅलर प्रति पिंप झाली.(cheap stocks to buy)

बीएसई सेन्सेक्स १,३३५ अंकांनी वाढला आणि तो ६०,६११ वर बंद झाला. सेन्सेक्स मिडकॅप ३१० अंकांनी वाढत त्याचा दिवसाचा शेवट २४,७५४ वर झाला. बीएसई स्मॉलकॅप ४८३ अंकांनी वाढला आणि दिवसअखेर २९,१८२ वर बंद झाला. बीएसई सेन्सेक्समध्ये सर्वोच्च मूल्यकामगिरी करणारे एचडीएफसी बँक, एचडीएफसी लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा स्टील आणि इंडसइंड बँक हे समभाग होते.(cheap stocks to buy)

निफ्टी ५० निर्देशांक ३८२ अंकांनी वाढून १८,०५३ वर बंद झाला. बँक निफ्टीने आश्चर्यकारक १,४८६ अंक अशी वाढ नोंदविली आणि त्याचा सत्रशेवट ३८,६३५ वर झाला. निफ्टी५० निर्देशांकात एचडीएफसी बँक, एचडीएफसी लिमिटेड, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स आणि कोटक बँक हे सर्वाधिक वाढणारे शेअर होते.

शेअर सद्य मूल्य (रु.) किंमत वाढ (%)
विनित लेबाँ. ६८.२० १९.९६
बायो फिल केम ६७.१० १०.००
क्युबेक्स ट्युब्स २५.२० ५.००
डेल्टा मॅन्यु. ७३.६० ४.९९
व्हीएसएल ८७.३५ ४.९९
एसपीएमएल इन्फ्रा. ६३.३० ४.९८

सोमवारी अशा तेजीच्या व्यवहारात काही कमी किंमतीच्या स्टॉकचा अप्पर सर्किट गाठणा-या शेअरमध्ये समावेश झाला. यादीत दिलेल्या अशा शेअरवर गुंतवणूकदारांनी आगामी सत्रांसाठी नजर ठेवायला हवी –

हेही वाचा :


भाजप-मनसे युती होणार का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *