आज या स्टॉक्सकडे लक्ष असू द्या, देतील भरघोस कमाई..!

sensex today

बीएसई सेन्सेक्स (sensex today) बुधवारी थेट १,०३९ अंकांनी झेपावत ५६,८१६ वर पोहोचला. बीएसई मिडकॅप निर्देशांक ४१७ अंकांनी वाढला. त्याचा दिवसाचा शेवट २३,५७२ वर स्थिरावला. बीएसई स्मॉलकॅप दिवसअखेर ३९५ अंकांनी वाढून २७,३८३ वर पोहोचला निफ्टी५० निर्देशांक मंगळवारच्या तुलनेत ३०६ अंकांनी वर पोहोचत १६,९६९ वर थांबला. तर बँक निफ्टी हा महत्त्वाचा क्षेत्रीय निर्देशांक ६८० अंकांनी वाढून दिवसाच्या शेवटी ३५,७०२ वर पोहोचला.

टोरेंट पॉवर – टोरेंट पॉवर लिमिटेडने दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकांशी शेअर खरेदी करार (SPA) आणि शेअरहोल्डर करार (SHA) केला आहे. ५१% इक्विटी शेअर भांडवलाच्या खरेदी अंतर्गत प्रमुख हिस्सा राखणा-या कंपनीबरोबर वीज वितरण आणि किरकोळ पुरवठ्यासाठी सहकार्य करण्यात आले आहे. कंपनीचा दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात वितरण परवाना आहे. या व्यवहारामुळे देशातील आघाडीची वीज वितरण कंपनी म्हणून टोरेंट पॉवरचे स्थान लक्षणीयरीत्या भक्कम होईल.(sensex today)

sensex today

टाटा कम्युनिकेशन्स – फॉर्म्युला वन आणि टाटा कम्युनिकेशन्सने एक जागतिक तंत्रस्नेही सुविधा सक्षम करणारे, वेगाने वाढणाऱ्या तंत्रपूरक अर्थव्यवस्थेला सामर्थ्य देणारे बहु-वर्षीय धोरणात्मक सहकार्य बुधवारी घोषित केले. टाटा कम्युनिकेशन्स ही जागतिक स्तरावर तांत्रिकदृष्ट्या प्रगत अनुभव देण्यासाठी फॉर्म्युला वनचे अधिकृत प्रसारण जोडणी पुरवठादार म्हणून क्षेत्रात माघारी आली आहे.

बुधवारचे आघाडीचे काही स्टॉक – निफ्टी५० इंडेक्समध्ये अल्ट्राटेक सिमेंट, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी आणि इन्फोसिस हे आघाडीचे शेअर ठरले. तर बीएसई सेन्सेक्समध्ये श्री सिमेंट्स, बाजाज ऑटो, अल्ट्राटेक सिमेंट, अॅक्सिस बँक आणि इंडसइंड बँक हे सर्वाधित तेजी नोंदविणारे शेअर होते.

हेही वाचा :


कोल्हापुरातील खळबळ जनक बातमी ! विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *