पेटीएम शेअर्सची किंमत घसरली…

paytm share

पेटीएमच्या शेअर्ससाठी (paytm share) सोमवारची सुरुवात खूपच खराब झाली. पेटीएमचे शेअर्स सुरुवातीच्या व्यापारात 12 टक्क्यांनी घसरून 672 रुपयांवर आले. पेटीएम शेअर्सचा हा लाइफ टाइम लो आहे. याआधी शुक्रवारी आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँक (Paytm Payements Bank) वर नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घातली होती. याचा परिणाम आज पेटीएमच्या शेअर्सवर दिसून येत आहे.

आरबीआयने आयटी (Information Technology) ऑडिट करण्याचे आदेशही दिले आहेत. आयटी ऑडिटचा अहवाल पाहिल्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने दिली जाणार आहे.

यानंतर पेटीएम (paytm share) पेमेंट्स बँकेने एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आरबीआयच्या अटी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. पेटीएम पेमेंट्स बँकेने ट्वीट केले की, “प्रिय ग्राहकांनो, आम्ही तुमच्याशी असलेल्या आमच्या संबंधांना महत्त्व देतो आणि आम्ही आरबीआयच्या नियमांची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आमच्या विद्यमान ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय बँकिंग सेवा मिळत राहतील.

11 मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला (Paytm Payments Bank) नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. यासोबतच आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेचे आयटी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. आयटी ऑडिटचा अर्थ असा आहे की कंपनीचे आयटी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच सॉफ्टवेअर अनेक ग्राहकांचा भार उचलण्यास सक्षम आहे, त्यात काय त्रुटी आहेत आणि त्या का येत आहेत, या सर्व गोष्टींची चौकशी केली जाईल.


हेही वाचा :


मुंडे बहीण-भावात पुन्हा शाब्दिक युद्ध


शरद पवारांसह महाविकास आघाडीचे नेते निशाण्यावर


आमिर खानचा धक्कादायक खुलासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *